आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड/परभणी/ हिंगोली- मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर जनजीवन पूर्वपदावर येत नाही तोच रविवारी रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. नांदेड शहरात सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत तब्बल ६२.५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३७.७० मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली.
रविवारी रात्रीपासून नांदेड जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने ठाण मांडले. रविवारी रात्री उशिरा विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला. जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर सोमवारी सकाळी ८ वाजता दरवाजा बंद करण्यात आला. पण दुपारी ४ वाजता पुन्हा उघडण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात सोमवारी (२० ऑगस्ट) रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत एकूण १३.०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी ६५.२६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात या आठवड्यात सातत्याने रिमझिम पाऊस सुरू आहे. सहा दिवसांच्या पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची सरासरी ४२२ मिलिमीटरवर पोहोचली. रविवारी परभणी जिल्ह्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९.८४ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ३९२.७५ मिमी पाऊस झाला अाहे.
वडगाव ज. (ता.हिमायतनगर) गावाजवळील पूल पार करताना मारुती संग्राम बिरकुरे (६२) हा शेतकरी पुरात वाहून गेला. त्यांचा सायंकाळपर्यंत काही ठावठिकाणा लागला नाही. तर हदगाव तालुक्यातील कवाना येथील भारत हरिभाऊ तोडकर (३५) हा शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेला. नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.