आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर-उस्मानाबाद वगळता मराठवाड्यात जोरदार पाऊस; जालन्यात वीज पडून ३ ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : मराठवाड्यात लातूर-उस्मानाबाद वगळता इतर सर्व जिल्ह्यांत रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. जालना तालुक्यात भागडे सावरगाव येथे दुपारी लिंबाच्या झाडावर वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. एक दहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. नांदेड, हिंगाेली, परभणी, जालना, अाैरंगाबाद अाणि बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जालना तालुक्यातील भागडे सावरगाव येथे झाडाखाली थांबलेल्या शेतमजुरांवर वीज काेसळली. यात गयाबाई गजानन नाईकनवरे (५३), संदीप शंकर पवार (३०), मंगल नागोराव चापले (३६) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमन साहेबराव नाईकनवरे आणि संदीप पवार यांचा दहा वर्षे वयाचा मुलगा गंभीर जखमी झाला. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसाने नुकसान झाले आहे. सायंकाळपर्यंत वडीगोद्री, घनसावंगी, पिंपळगाव रेणुकाई परिसर, अंबड परिसरात पाऊस झाला आहे. दोन दिवस बरसणार पुणे : मराठवाड्याच्या अनेक भागांत, कोकण व गोव्यात ७-८ ऑक्टोबरला पाऊस पडेल. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह सरी बरसतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. दरम्यान, उत्तराखंडमधील ऋतुबदलाचे संकेत पाहता राज्यात थंडी लवकर सुरू होईल.

बीड : ६ तालुक्यांत पाऊस
बीड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये, तर नांदेड शहरात दुपारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. देगलूर तालुक्यातील कोकलगाव, माळेगाव व शिळवणी येथे वीज पडून सात जनावरे दगावली. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुपारी चांगला पाऊस झाला. परभणी शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.
 

बातम्या आणखी आहेत...