आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात आणखी दोन दिवस चांगल्या पावसाची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पावसाने सोमवार २० आॅगस्ट रोजी विदर्भात सर्वदूर हजेरी लावली. शेतीयोग्य पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. जुलैचा अपवाद वगळता विदर्भात फारसा पाऊस झाला नाही. आॅगस्टचा पंधरवडाही कोरडा गेला. त्यामुळे शेतकरी धास्तावला होता. परंतु सोमवारी पावसाने विदर्भात दमदार हजेरी लावली. 


बंगालच्या उपसागरात उत्तर-पश्चिमेला तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस येत असून आणखी दोन दिवस चांगला पाऊस राहिल. त्या नंतर हळूहळू कमी होत जाईल, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने दिली. पश्चिम िवदर्भापेक्षा पूर्व विदर्भात जास्त पाऊस राहिल, असे सूत्रांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात मागील ७२ तासांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...