आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे राजकारण्यापाठोपाठ शेतकऱ्यांनाही फटका, शेतकऱ्याने मांडली व्यथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मागील 4 दिवसांपासून राज्यभर निवडणुकीच्या प्रचारसभांना धो-धो धुणाऱ्या परतीच्या पावसाने शनिवारी रात्री जिल्ह्यात शेतकऱ्यांनाही झोडपले. चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत तब्बल 77 मिलिमिटर पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून, सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात जुंपल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होवू शकत नसल्याची स्थिती आहे. यात भारुडखेडा तालुका, जामनेर येथील एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली आहे. ते म्हणाले की, "नेते पावसात भिजल्याची चर्चा होते आहे, पण शेतमाल पाण्यात गेल्याचे कोणी पाहत नाही."


चार दिवसांपासून राज्यभर मु्क्काम ठोकून बसलेल्या परतीच्या पावसाने कहर केलाय. निवडणुकीचा काळ असल्याने अनेक ठिकाणच्या प्रचारसभांवर पावसाने पाणी फेरले. त्यातच आता शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे. मका, ज्वारी, सायाबीन, कापूस या पीकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यात तब्बल 77 मिलिमिटर पाऊस झाला. आता निवडणुका असल्याने अधिकारी त्यात व्यस्त आहेत आणि त्यामुळेच 
पिकांच्या पंचनाम्यांच्या अडचणी येऊ लागल्या आहेत. 21 ऑक्टोबरला मतदानआाणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी आहे. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या आहेत. दरम्यान, या सर्व प्रक्रियेत प्रशासकीय यंत्रणा अडकल्याने परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कौफियत ऐकुन घेण्यासाठी कोणीही उपलब्ध नाहीये. 


चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे शेतीपीकांचे माठे नुकसान झाले आहे. मका आणि ज्वारीसोबत कापूसदेखील गळून पडला आहे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणेचे देखील शेतीच्या नुकसानीकडे दुर्लक्ष आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 124.7 मिलीमिटर पाऊस झाला आहे. त्यामुळे आधीच जलाशये आणि नद्यांना पाणी आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. वाघुरला सर्वात मोठा पूर आल्याने सकाळीच धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले होते. शनिवारी रात्री चाळीसगावात सर्वाधिक 77.1 मिलीमिटर पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी 19 मिलिमिटर पाऊस पडला. 
शनिवारी रात्री झालेल्या पाऊसात चाळीसगाव 77.1 मिमी. जामनेर 38.8 मिमी, जळगाव 14.8 मिमी, एरंडोल 6.8 मिमी, भुसावळ 12.2 मिमी, मुक्ताईनगर 30.8 मिमी, बोदवड 32.7 मिमी., पाचोरा 23.6 मिमी., भडगाव 24.5 मिमी, पारोळा 15.6 मिमी, रावेर 6.9 मिमी. यावल 8 मिमी. आणि अमळनेरमध्ये 5.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...