आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Heavy Rains Alert In Gujarat, Rajkot Likely To Cancel Second T20 Between India Bangladesh

गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, राजकोटमध्ये भारत-बांग्लादेशमध्ये होणारा दुसरा टी-20 होऊ शखतो रद्द

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- भारत आणि बांग्लादेशमध्ये 7 नोव्हेंबरला होणारा दुसरा टी-20 सामना मुसळधार पाऊस आणि वादळामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. हवामाना खात्याने सांगितल्यानुसार, ‘महा’ चक्रीवादळ 6 नोव्हेंबरला संध्याकाळी किंवा 7 नोव्हेंबरला सकाळी गुजरातच्या किनारपट्टीवरर धडकू शकते. यामुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान वादळही येण्याची शक्यता आहे. ज्या भागात वादळाचा परिणाम पडू शकतो, त्याच भागात राजकोट आङे. त्यामुळे तीन टी-20 सीरीजमधील दुसरा
सामना रद्द होऊ शकतो. 

चक्रीवादळाचा सर्वात जास्त परिणाम सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्यो होण्याची शक्यता आहे. राजकोट सौराष्ट्रचा भाग आहे. हवामान खात्याने सांगित्यानुसार, "महा" चक्रीवादळ 6 नोव्हेंबरच्या संध्याकाळी किंवा 7 नोव्हेंबरच्या सकाळी किनारपट्टीवर धडकू शकते. पावसासोबतच 120 किलोमीटर प्रति तासांच्या वेगाने वाहणारे वारेही येऊ शकतात. त्यामुळे सामन्यावर संकट आहे. तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये बांग्लादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे, त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.  

हर्षा भोगले आणि अश्विनने व्यक्त केली चिंता
 

क्रिकेट कमेंटेटर हर्षा भोगले आणि टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने हवामानाच्या या पुर्वानुमानवर चिंता व्यक्त केली आहे. भोगलेने ट्विटरवर लिहीले, "गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये 6 आणि 7 नोव्हेंबरला चक्रीवादळाची शक्यता आहे. राजकोटमध्ये टी-20 होणार आहे. आशा आहे की, सायक्लोनदरम्यान लोक सुरक्षित राहावे. हवामानाचा काही अंदाज येत नाहीये." अशिवननेही ट्वीट केला,"प्रकृती आपली नाराजी व्यक्त करत आहे."

बातम्या आणखी आहेत...