आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू; 3500 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दक्षिणपूर्व ब्राझीलमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे

रियो डे जेनेरो- दक्षिणपूर्व ब्राझीलमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे भूस्खलन होऊन आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे तर 17 जण बेपत्ता झाले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे आणि आतापर्यंत 3500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बचाव कार्य करत असलेल्या सिव्हील डिफेंस टीमने सांगितल्यानुसार, मिनास गॅरेस राज्यात हा पाऊस सुरू आहे. अनेक लोकांना वाचवले जात आहे.


सुरुवातील मृतांची संख्या 11 होती पण, शनिवारी हा आकडा वाढला. बहुतेक मृत्यू राजधानी बेलो हॉरिजोंटे मध्ये झाले. हवामान खात्याने सांगितल्यानुसार, या शहरात शुक्रवारी मागील 110 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला आहे. येथे मागील 24 तासात 171.8 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...