आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai Rains / मुंबईत पुन्हा मुसळधार, अनेक भागांत पाणी साचले; पुढील दोन दिवस आणखी पावसाची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राजधानीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. यात मुंबईला पावसाने सर्वात वाइट झोडपले. अनेक भागांमध्ये मंगळवारी रात्रीच्या पावसाने पाणी साचले. लोक रेल्वेचा ट्रॅक पाण्याखाली गेल्याने मुंबई मंदावली. अंधेरी फ्लायओव्हरसह अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने बुधवारी सकाळी ट्रॅफिक जॅम झाला. यामुळे शाळा आणि कार्यालयात जाणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या दरम्यान अंधेरी उड्डानपुलावर तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. 


मुंबईत हिंदमाता, दादर, अंधेरी, सायनमध्ये रस्त्यांवर आणि रेल्वे रुळांवर पाणी भरले आहे. कुलाबात बुधवारी सकाळी 5.30 वाजेपर्यंतच 171 मिमी, सांताक्रूजमध्ये 58 मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे मायानगरीत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस बरसणार आहे. मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सुद्धा गुरुवारी मोठ्या पावसाची शक्यता आहे. येथे जुलै महिन्यात सरासरी 840 मिमी पावसाची नोंद केली जाते. या वर्षी 8 जुलै पर्यंत 708.7 मिमी पाऊस बरसला आहे.

बातम्या आणखी आहेत...