आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, कोकणला पावसाने झोडपले : शनिवार, रविवारी मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई आणि कोकणात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. मुंबईत रात्री नऊपर्यंत ७५ मिमी पावसाची नोंद झाली होती. बांद्रा भागात २४ तासांत २६६ मिमी पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेत झाली. या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. प्रशासनाने लोकांनी समुद्र आणि सखल भागापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईत येणारी १७ विमान उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली. शनिवार आणि रविवारी राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. 


या काळात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात प्रशासनाने सज्ज राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार तर मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.


मराठवाड्यात पावसाची हजेरी  
मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यांत शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. नांदेड शहरासह हदगाव,किनवट, हिमायतनगर येथे पाऊस झाला. शुक्रवारी उस्मानाबाद, परभणी, औरगाबाद जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जालना जिल्ह्यात मंठा, भोकरदन, अंबड, तीर्थपुरी, आष्टी भागात जोरदार सरी कोसळल्या. 

बातम्या आणखी आहेत...