• Home
  • National
  • Heavy snowfall in Jammu and Kashmir, 6 killed including 2 soldiers in accident

हवामान बदल / जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड बर्फवृष्ठी, अपघातात 2 जवानांसहित 6 जणांचा मृत्यू

  • जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारपासून बर्फवृष्ठी सुरू, श्रीनगरचे तापमान शुन्यपेक्ष कमी झाले
  • वर्फवृष्ठीमुळे श्रीनगर-जम्मू हायवे बंद, रस्त्यांवर 2000 वाहने अडकली
  • श्रीनगर एअरपोर्टवर पुढील 24 तास सर्व विमान उड्डाणे रद्द

Nov 07,2019 05:10:00 PM IST

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारपासून सुरू असलेल्या वर्फवृष्ठीमुळे जन-जीवन विस्कळीत झाले आहे. बर्फवृष्ठीदरम्यान झालेल्या अपघातांमध्ये लष्कराच्या 2 जवानांसहित 6 जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीनगर एअरपोर्टवर लो व्हिजिबिलिटीमुळे सर्व विमाने रद्द केली आहे. तसेच, श्रीनगर-जम्मू हायवेदेखील बंद करण्यात आला आहे.


कुपवाडामध्ये हिमस्खलन, दोन जणांचा मृत्यू

श्रीनगरच्या लानगेट परिसरात लो व्हिजिबिलिटीमुळे लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. अपघातात रायफलमॅन भीम बहादुर आणि गनर अखिलेश कुमार यांच्या मृत्यू झाला. तसेच, कुपवाडमध्ये हिमस्खलनामुळे लष्कराच्या पोस्टवर माल भरणाऱ्या दोन व्यक्ती मंजूर अहमद आणि इशाक खान यांच्या मृत्यू झाला. याप्रकारेच श्रीनगरमध्ये विद्युत विभागातील एक कर्मचारी आणि हबाक परिसरातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.


पुढील 24 तास बर्फवृष्ठीचा अलर्ट

श्रीनगर एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की, खराब हवामान आणि लो व्हिजिबिलिटीमुळे सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. हवामना विभागाने पुढील 24 तास बर्फवृष्ठीचा अलर्ट दिल्यामुळे विमान सेवा कधी सुरू हे सांगता येणार नाही. आज सकाळी रनवे साफ करण्याचे काम सुरू केले होते, पण बर्फवृष्ठी सुरू असल्याने ते पूर्ण होऊ शकले नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जोपर्यंत बर्फवृष्ठी बंद होणार नाही, तोपर्यंत विमान सेवा सुरू होणार नाही.


श्रीनगरचा संपर्क तुटला

पीर पंजालमध्ये राजौरी स्थित मुगल रोड पूर्णपणे बंद झाला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, राजधानी श्रीनगरमधील काही भाग जसे, गुरेज, माछिल, केरन आणि तंगधारला जोडणारे रस्ते पूर्णपणे बंद आहेत. त्यामुले हायवेवर अंदाजे 2 हजार वाहने अडकली आहेत.


गुलमर्गमध्ये सर्वात जास्त बर्फवृष्ठी

अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, श्रीनगरमध्ये गुरुवारी सकाळपर्यंत 11 सेमी बर्फवृष्टी झाली होती, तर घाटीचे गेटवे शहर काजीगुंडमध्ये 12 सेमी पर्यंत बर्फवृष्ठी झाली. गुलमर्गमध्ये सर्वात जास्त 62 सेमी पर्यंत बर्फवृष्टी झाली.

X