Home | International | Other Country | Heavy Storm Uplifted a 215 year Old Tree, People Called Police

वादळात पडले 215 वर्ष जुने झाड, मुळांकडे पाहताच लोकांनी बोलावले पोलीस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 12:38 PM IST

नॉर्थ आयर्लंडमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या एका वादळानंतर एक विचित्र घटना घडली. येथे वादळामध्ये 215 वर्ष जुने एक झाड उन

 • Heavy Storm Uplifted a 215 year Old Tree, People Called Police

  आयर्लंड - नॉर्थ आयर्लंडमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या एका वादळानंतर एक विचित्र घटना घडली. येथे वादळामध्ये 215 वर्ष जुने एक झाड उन्मळून पडले. त्यानंतर या झाडाची मुळे वरती आली. परंतु लोकांना त्या झाडांच्या मुळांमध्ये अडकलेली हाडे दिसली. त्यानंतर तेथील लोकांनी पोलिसांना फोन केला.


  पोलिसही झाले आश्चर्यचकित
  - डार्क हॅजेस नामक या प्रसिद्ध ठिकाणी पोलीस आल्यानंतर त्यांना या झाडाच्या मुळाशी अर्धा हाडांचा सांगाडा आढळून आला. सांगाड्याचा काही भाग झाडाच्या मुळांमध्ये अडकलेला होता. पोलिसांनाही नेमकं हे काय आहे, याविषयी समजत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी काही वैज्ञानिकांना घटनास्थळी बोलावले.


  वैज्ञानिकांनी केला शोध सुरु
  - वैज्ञानिकही झाडांच्या मुळाशी निघालेला हाडांचा सांगाडा पाहून चकित झाले होते. तपासामध्ये हे झाड 215 वर्ष जुने असल्याचे आढळून आले. हे भीमकाय झाड ज्या वादळामुळे पडले त्या वादळाची स्पीड 160 किमी/तास होती. वैज्ञानिकांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा होता की, हा सांगाडा कुणाचा आहे आणि या झाडाखाली तो कसा? वैज्ञानिकांनी अधिक शोध घेऊन याचा अभ्यास केल्यानंतर समोर चकित करणारे काही खुलासे झाले.


  कार्बन डेटिंगवरून समजले सांगाड्याचे वय
  - वैज्ञानिकांनी कार्बन डेटिंग हा सांगाडा ज्या व्यक्तीचा होता त्याचे वय मृत्यूच्या वेळी 17 ते 20 वर्षांचे होते. त्यानंतर कार्बन आयसोटोपने समजले की हा पुरुष सांगाडा असून 1000 वर्षांपूर्वीचा आहे. एक्स्पर्टसने सांगितले की, कार्बन आयसोटोप्सच्या माध्यमातून अशाप्रकारच्या गोष्टींचे निश्चित वय समजू शकते कारण कार्बन आयसोटोप्स एका निश्चित गतीने कमी होत जातात. या सांगड्याची उंची जवळपास सहा फूट होती. परंतु त्या काळातील सामान्य उंचीनुसार ही उंची कमी होती.


  परंतु नंतर चकित करणाऱ्या गोष्टी समोर आल्या
  - सुरुवातीला ज्या गोष्टी समोर आल्या त्यापेक्षा जास्त चकित करणाऱ्या गोष्टी हाडांचा अभ्यास केल्यानंतर समोर आल्या. या व्यक्तीचे शरीर कापण्यात आले होते. त्याचे शरीर मधोमध कापल्यानंतर त्याचे हात कापण्यात आले होते. यावरून व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक झाला नसल्याचे लक्षात आले. यामध्ये दोन शक्यता असू शकतात. पहिली म्हणजे या व्यक्तीचा मृत्यू भांडणात किंवा त्याला क्रूर शिक्षा देण्यात आली असावी. किंवा युरोपमध्ये त्यावेळी झालेल्या एखाद्या युद्धामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा.

 • Heavy Storm Uplifted a 215 year Old Tree, People Called Police
 • Heavy Storm Uplifted a 215 year Old Tree, People Called Police
 • Heavy Storm Uplifted a 215 year Old Tree, People Called Police
 • Heavy Storm Uplifted a 215 year Old Tree, People Called Police
 • Heavy Storm Uplifted a 215 year Old Tree, People Called Police
 • Heavy Storm Uplifted a 215 year Old Tree, People Called Police

Trending