आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कित्येक आजारांचे मूळ आहे लठ्ठपणा, तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील उपाय करू शकता 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लठ्ठपणा होणे कित्येक आजाराचे कारण आहे. याच्या लक्षणांना समजून घेऊन वेळीच सवयींमध्ये बदल करा जेणेकरून लठ्ठपणापासून होणाऱ्या गंभीर आजारांपासून बचाव करता येईल. 


योग्य वजन 
एका व्यक्तीच्या शरीराचे अपेक्षित वजन त्याच्या उंचीनुसार असायला पाहिजे ज्यामुळे त्यांच्या शरीराची रचना अनुकल राहील. शरीराच्या वजनाला मोजण्यासाठी सर्वात प्रचलित उपाय आहे बॉडी मास इंडेक्स (बीएमआई) जे व्यक्तीच्या उंचीला दुप्पट करून त्यात वजन किलोग्रॅमला भाग देऊन काढले जाते. 


जाडपणाचे लक्षण- 
- तुम्हाला दम लागणे. 
- घामात वाढ होणे. 
- जास्त घोरणे. 
- शारीरिक कार्यासोबत सामंजस्य करण्यामध्ये अचानक असमर्थतेचा अनुभव येणे. 
- थकवा जाणवणे. 
- पाठीत आणि सांध्यात दुखणे. 
- आत्मविश्वास आणि आत्मसन्मानात अभाव अनुभवणे. 
- एकटे आिण दुलर्क्षित जाणवणे. 


मानसिक बाजू 
ताण-तणाव, उदासीनतासारख्या भावनांमुळे काही लोकांना खूप भूक लागते. याला दूर करण्यासाठी ते लोक खूप जेवतात. ज्यामुळे वजन वाढते. वेळीच लक्ष दिले नाही तर इतर आजार होण्याची शक्यता असते. 


लठ्ठ होण्याची कारणे
ओबेसिटी एक लाइफस्टाइल डिसिस आहे. लठ्ठपणाचे अनेक कारणे असू शकतात. यातील प्रमख म्हणजे कॅलरीचे सेवनातील आणि उपयोगात असंतुलन असणे. यामागे जंक फूड, प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड आणि असंतुलित आहार ही प्रमुख कारणे आहेत. गरजेपेक्षा जास्त खाणे, जास्त चरबीयुक्त आहाराने गतीने जाडी वाढते. आधुनिक जीवनशैलीमध्ये होणारे परिवर्तन, व्यायाम न करणे यामुळे जाडी वाढते. मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्हीसमाेर जास्तवेळ बसून राहिल्यानेही वजन गतीने वाढते. 


औषध 
गर्भनिरोधक गोळ्या आणि नैराश्यतेचे औषध वजन वाढवते. हायपोथायरॉयडिज्म पॉलिसिस्टिक ओवरी सिंंड्रोम्ससारख्या आरोग्याच्या अवस्थादेखील तुमच्या लठ्ठपणाचे कारण होऊ शकते. 


याचेे दुष्परिणाम 
लठ्ठपणामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवांवरही दुष्परिणाम होतो. वजन वाढल्यामुळे हृदयरोग, कोलेस्ट्रोल, रक्तदाब, मधुमेह, दमा, कर्करोग, झोप न येणे, सांधेदुखी, चालण्यास त्रास होणे, दम लागणे, बाळ न होणे, यामुळे सामाजिक आणि आर्थिक जीवनावर नकारत्मक प्रभाव पडू शकतो. लठ्ठपणामुळे लोक कायम उदासीन राहतात. 


करू शकता या गोष्टी
- अवास्ताविक आहारातील परिवर्तनापासून दूर राहा. जसेे क्रॅश डायट, अनसुपरवाइज्ड डायट. आहारतज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय करणे किंवा इंटरनेटच्या मदतीने डायटिंग करण्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक असू शकतात. 


- तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा. आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम करा. अशा कार्याची निवड करा जे तुम्हाला आवडते आणि जे तुम्ही प्रदीर्घ करू शकाल. 


- टीव्ही आणि इंटरनेटवर असलेल्या जाहिरातीच्या मदतीने तुमचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका.

 
- वजन कमी करण्याचे कोणतेच औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. वजन वाढल्यास डॉक्टर वेट लाॅस गॅस्टिक बलूनचा सल्लाही देतात. हा बलून एंडोस्कोपीद्वारे पोटात टाकतात आणि सलाइनद्वारे फुगवतात. हा वजन कमी करण्यास फायदेशीर आहे.

बातम्या आणखी आहेत...