आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलन यांनी फॅमिली-फ्रेंड्ससोबत साजरा केला 80 वा वाढदिवस, आशा पारेख-वहिदा रहेमानसोबत पोहोचले हे सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री हेलन यांनी 21 नोव्हेंबर रोजी वयाची 80 वर्षे पूर्ण केली. हेलन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोहेल खानने त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला संपूर्ण खान फॅमिली उपस्थित होती. सलीम खान, सलमा खान यांच्यासह सलमान खान, सोहेल खान, अर्पिता शर्मा, अलविरा अग्निहोत्री यांनी पार्टीला उपस्थिती लावली होती. याशिवाय हेलन यांच्या समवयीन अभिनेत्री वहिदा रहमान आणि आशा पारेख यांनीही पार्टीला हजेरी लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या पार्टीत सलमानची गर्लफ्रेंड लुलियादेखील यावेळी हजर होती.