पडद्यामागील / हाेलाेन हीलिंग : काेरियात मृत्युपूर्व अनुभूतीचा व्यवसाय‌!

या अनुभवानंतर जीवनाचे महत्त्व कळते. माणूस आपल्या पूर्वग्रह आणि आत्मकेंद्री मानसिकतेतून मुक्त होताे

जयप्रकाश चौकसे

Nov 08,2019 10:52:00 AM IST

एका दक्षिण कोरियन कंपनीने नवा व्यवसाय सुरू केला आहे. जिवंत माणसावर कफन ओढून १० मिनिटे शवपेटीत झोपवले जाते. तिला जमिनीत गाडण्यात येते. कंपनीचा दावा असा की, या अनुभवानंतर जीवनाचे महत्त्व कळते. माणूस आपल्या पूर्वग्रह आणि आत्मकेंद्री मानसिकतेतून मुक्त होताे. चांगला काळ व्यतीत करतो. होलोन हीलिंग सेंटरमध्ये २५ हजार लोकांनी पैसे मोजून हा मृत्युपूर्व अनुभव घेतला आहे. या व्यवसायाचे नाव हीलिंग अर्थात जखम भरणे असा आहे. या अनुभवातून गेल्यानंतर एका तरुणाने नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. मृत्यूचा हा मृत्युपूर्व अनुभव घेऊन लोकांनी जीवनशैली बदलली आहे. यक्षाच्या एका प्रश्नावर युधिष्ठिर म्हणतात की, सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट ही की, मृत्यू एक अटळ सत्य असूनही लोक त्याबद्दल विचार करत नाहीत.

संजय लीला भन्साळीच्या हृतिक रोशन अभिनीत चित्रपटाचा नायक एका असाध्य रोगाने ग्रासलेला आहे. आपल्या मृत्यूची वेळ जवळ येताच तो मित्रांना बोलवून उत्सव साजरा करतो. अस्मादिकांच्या ‘शायद’ चित्रपटात कर्करोगाशी लढणारा नायक आपल्या पत्नीला विषाचे इंजेक्शन द्यायला सांगतो. इंजेक्शन देताना तिने वधूचा वेश परिधान करावा, असा आग्रह धरतो. या वेळी दुष्यंतकुमारांच्या गाण्याचा वापर केला आहे. चित्रपटात विषारी दारूमुळे अनेक लोक मरतात. क्षिप्रा नदीच्या किनारी अनेक चिता जळत असल्याचे दृश्य आहे. या दृश्यातही दुष्यंत यांनी लिहिलेल्या गाण्याचा प्रयोग करण्यात आला आहे - “”वह देखो उस तरफ उजाला है, जिस तरफ रोशनी नहीं जाती कि यह जिंदगी इस तरह से जी नहीं जाती.’


‘माधुरी’चे ‘संपादक’ अरविंद कुमार यांनी या दृश्यातील दुष्यंत यांच्या गझल वापराचे कौैतुक केले होते. या गाण्याचा संदेश होता की, देशाच्या राजधानीत प्रकाश आहे, मात्र ज्ञानाचा उजेड नाही.
आजही काही ठिकाणी सतीप्रथा सुरू आहे. विधवेला अफू दिली जाते. नशेमुळे तिला वास्तवाचे ज्ञान होऊ नये हा हेतू. आमिर खानच्या मंगल पांडेमध्ये एक सती जातानाचे दृश्य आहे. एक इंग्रज अधिकारी त्या महिलेला वाचवतो. आपल्या घरी आश्रय देतो. गावकरी काठ्या घेऊन त्याच्या घरावर चालून जातात. मात्र, तो हवेत गोळीबार करून गर्दी पांगवतो. त्यानंतर ती महिला आणि इंग्रज अधिकाऱ्यात प्रेम होते.


बंगालचे कादंबरीकार ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या ‘आरोग्य निकेतन’ पुस्तकात एका नाडी वैद्याची जीवनकथा आहे. एक आजारी व्यक्ती लवकरच मरणार आहे. मात्र, हे नातेवाइकांना कसे सांगायचे? वैद्य रुग्णाच्या पत्नीला माशाचे डोके खाण्याचा सल्ला देतो. हा एक संकेत आहे. कारण बंगालमध्ये विधवेला मासे खाण्याची अनुमती नाही. माशाचे डोके अतिशय स्वादिष्ट व शक्तिशाली मानले जाते. विरोधाभास बघा, मासे खाण्याने स्मरणशक्ती वाढते.

X
COMMENT