आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान आई सलमासाठी जी वस्तू आणतो, तशीच वस्तू हेलनसाठीही आणतो, ऐकेकाळी वडिलांच्या दुस-या लग्नामुळे होता नाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. हिंदी सिनेमातील प्रसिध्द अभिनेत्री हेलन 80 वर्षांच्या झाल्या आहेत. 21 नोव्हेंबर, 1938 ला बर्मा (वर्तमान म्यांमार)मध्ये जन्मलेल्या हेलन यांचे खरे नाव हेलन रिचर्डसन खान आहे. सलमानचे वडील सलीम खानने 1981 मध्ये हेलनसोबत दूसरे लग्न केले. लग्नानंतर खान कुटूंबात अनेक वाद होते. सलमानसोबतच तिघेही भाऊ हेलनच्या विरुध्द होते आणि हेलनसोबत बोलत नव्हते. सलीम यांच्या पहिल्या पत्नी सुशीला चरक(सलमा खान) या लग्नामुळे खुप दुःखी होत्या. एका मुलाखती दरम्यान सलमान स्वतः म्हणाल्या होत्या की, त्या या लग्नामुळे खुप डिप्रेस्ड आणि डिस्टर्ब होत्या. 


या कारणांमुळे सलीम खानवर फिदा होत्या हेलन
1957 मध्ये हेलन स्वतःपेक्षा मोठ्या डायरेक्टर पीएन अरोडासोबत लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहत होत्या. हेलन चित्रपटांमध्ये चांगली कमाई करायची आणि अरोडा या गोष्टीचा फायदा उचलून वायफळ खर्च करत होते. ऐकेकाळी अरोडाच्या अशा खर्च केल्यामुळे हेलन यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली. त्यांचे अपार्टमेंटही भाडे न दिल्यामुळे सीज करण्यात आले. अरोडापासून वेगळे झाल्यानंतर हेलन काही वर्षे एकट्या राहिल्या. 1962 मध्ये 'काबिल खान' चित्रपटा दरम्यान हेलनची भेट सलीम खानसोबत झाली. सलील हेलनला पाहताच त्यांच्या प्रेमात पडले. सलीम यांनी हेलनला चित्रपट मिळवून देण्यात मदत केली, यासोबतच हेलनला आर्थिक मदतही केली. सलीम यांच्या कोणत्याही अटीशिवाय मदतीमुळे हेलन त्यांच्यावर फिदा झाल्या. पण त्या काळात सलमानच्या आई सलीमा आनंदी नव्हत्या.

 

आता सलमा आणि हेलनला बरोबरीचा दर्जा देतो सलमान 
सलीम खानने एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सलमान पुर्णपणे हेलन यांच्या विरुध्द होत्या. यामुळे त्यांना पाहून मुलंही त्यांचा तिरस्कार करत होते. पण वेळे बरोबर सर्व निट होते, ही म्हण खरी आहे. हळुहळू तिन्ही भावांना जाणिव झाली की, हेलन वाईट नाही. ती खुप चांगली आहे आणि सर्वांची समान लक्ष ठेवते. तेव्हा सलीम आणि हेलन यांना सर्व काही मिळाले. संपुर्ण कुटूंब एकत्र झाले आणि प्रत्येक फंक्शनमध्ये सर्व लोक मिळून मिसळून राहू लागले. आज सलमान आई सलमाच्या जेवढा जवळ आहे तेवढाच तो हेलनच्याही जवळ आहे. तो सलमासाठी एखादी वस्तू आणली तर तशीच वस्तू हेलनसाठीही आणतो. तिन्ही भावांच्या नजरेत सलमा आणि हेलनला समान स्थान आहे. सलीम खानने आपल्या दोन्ही बायकांना समान दर्जा दिला आहे. त्यांच्यामध्ये कधीच वादविवाद झाल्याच्या बातम्या आल्या नाहीत.

 

हेलनही सलमान आणि त्याच्या भावांना सख्या भावांप्रमाणे मानते 
हेलनचे आपल्या सावत्र मुलांसोबत चांगले नाते आहे. हेलन आपली सावत्र आई आहे याची जाणिव सलमानने हेलनला कधीच होऊ दिली नाही. हेलन, सलमान आणि त्याच्या भाऊ-बहिणींना सख्या मुलांप्रमाणे मानते. हेलन आणि सलीम यांची मुलगी अर्पिता आहे, ही त्यांनी दत्तक घेतली आहे.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...