international special / मॅनहटनच्या 54 मजली ईमारतीवर हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटचा जागीच मृत्यू

हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर ईमारतीतल्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात आले

दिव्य मराठी वेब

Jun 11,2019 12:28:00 PM IST

न्यूयॉर्क- अमेरिकेच्या मॅनहटन शहरात एका 54 मजली ईमारतीवर सोमवारी संध्याकाली लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या क्रॅशमध्ये पयलटचा जागीच मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रयू कुओमोने सांगितले की, ऑगस्ता ए-109ई हेलिकॉप्टरची त्या ईमारतीवर एमर्जंन्सी लॅन्डिंग केली जात होती, यावेळी हेलिकॉप्टरमध्ये आग लागली. हिलीकॉप्टर क्रॅश होताच, ईमारतीतमधल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले.


गव्हर्नर कुओमो आणि मेअर बिल डी ब्लासियोने यांनी सांगितले की, या अपघातात ईमारतीमधील सर्वजण सुखरूप आहेत. लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. हेलिकॉप्टरला ईमारतीवर उतरवताना त्यात आग लागली, पण अग्नीशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

खराब हवामानामुळे अपघात
तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरने मॅनहटनच्या पूर्वेकडून भरारी घेतली होती. त्यावेळी शहरातील हवामान खराब होते, पायलटने हवामान ठीक होण्याची वाट न पाहताच उड्डाण घेतली. त्यानंतर काही वेळातच बॅटरी पार्क परिसरात हेलिकॉप्टर अनियंत्रित होऊन सेवंथ एव्हेन्यू परिसरातील एका बिल्डींगच्या 54 व्य मजल्यावर क्रॅश झाला.

X
COMMENT