आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही हेल्मेटसक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी - Divya Marathi
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

 नगर - शहरातून जाणाऱ्या महामार्गावर आणि शहरातही हेल्मेट वापरणे आवश्यक करण्यात आले आहे. लवकरच जिल्हाभरात हेल्मेट वापरणे अत्यावश्यक केले जाणार आहे. मानवी जीवन हे अनमोल असून प्रत्येकाने हेल्मेट वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे आवश्यक करण्यात आले आहे. 

 

विविध कोचिंग क्लासेस, शाळा-महाविद्यालयांनाही सूचना देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना हेल्मेट वापरण्याबाबत सूचना द्याव्यात, असे कळवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

 

शहर आणि महामार्गावर दुचाकी चालवताना हेल्मेट अत्यावश्यक आणि चारचाकी चालविताना सीट बेल्ट आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाणही कमी होईल, नागरिकांनी यासाठी स्वताहून पुढाकार घेऊन हेल्मेट वापरण्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन द्विवेदी यांनी केले. शासकीय कार्यालय परिसरात दुचाकीवर येताना हेल्मेट वापरावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. शहरात ठिकठिकाणी शिकवणी वर्गासाठी येणारे विद्यार्थी हेल्मेट वापरत नसल्याचे निदर्शनास आले. यासाठी शिकवणी चालकांनी प्रोत्साहन द्यावे, हेल्मेट ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी. 

 

कोणाचीही गय नाही 

शहरात वाहतुकीच्या प्रश्नाने अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहतूक करणाऱ्यांवर, विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांवर आणि वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम गतीमान करण्यात आली आहे, असे पोलिस दलाने सांगितले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...