आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवरील महिलेची पर्स खेचण्याचा प्रयत्नात दुचाकीवरून पडल्याने महिला गंभीर जखमी; हेल्मेटने वाचले प्राण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक - दुचाकीवरील महिलेची पर्स खेचण्याचा प्रयत्न झाल्याने ती महिला दुचाकीवरून खाली पडली. सुदैवाने डोक्यात हेल्मेट असल्याने तिचे प्राण वाचले. संशयितांनी पर्स खेचून पोबारा केला खरा, मात्र पर्समधील पैसे काढत असताना मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे एक संशयितांना जेरबंद तर दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात यश आले. मंगळवारी (दि. ८) रात्री आठ वाजता तपोवनरोड जयशंकर गार्डन येथे हा प्रकार घडला. 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती व राजेश्वरी शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री ८.३० अॅक्टिव्हा दुचाकीने तपोवनरोडने जयशंकर गार्डनकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी खांद्याला लावलेली बॅग हिसकावली. जोरात झटका बसल्याने शेट्टी दुचाकीसह खाली पडल्या, डोक्यात हेल्मेट असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र हात व पायांना गंभीर मार लागला. संशयित पर्स घेऊन फरार झाले. काही नागरिकांनी त्यांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मात्र, संशयित फरार झाले. याचवेळी मुंबईनाका पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पंकज शिरवले, दीपक वाघ हे खोडेनगर मैदान परिसरात गस्त करत असताना मैदानात दुचाकीवर तीन संशयित येताना दिसले. त्यांच्याकडील लेडीज पर्समुळे संशय बळावला. बीट मार्शलने त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. तिघांना ताब्यात घेत चौकशी केली असता मुज्जफर ऊर्फ तडक मेहमूद शहा (३०, रा. मोठा राजवाडा, काळे चौक) असे नाव त्याने सांगितले. दोघा अल्पवयीनांनाही ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 


गंभीर दुर्घटना टळली... 
वर्षापूर्वी नासर्डी पुलावर पैशांची बॅग हिसकवताना महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सहा महिन्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने हैदराबादस्थित टोळी जेरबंद केली होती. वरील घटनाही अशीच होती. सुदैवाने महिलेने हेल्मेट घातले असल्याने तिचे प्राण वाचले. 

 

हेल्मेटमुळे वाचले प्राण 
संशयित दुचाकीचालकांनी पर्स खेचताना जोराचा झटका दिला. अचानक घडलेल्या प्रकाराने दुचाकी घसरली. रस्त्यावर आपटले. डोक्यात हेल्मेट असल्याने गंभीर मार लागला नाही. नियमित हेल्मेट वापराची सवय असल्याने जीव वाचला. - राजेश्वरी शेट्टी, जखमी महिला 
 

बातम्या आणखी आहेत...