आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेटसक्ती : पुणेकरांना दिल्या पोलिसांनी सवा लाख पावत्या; पोलिस निरीक्षक विजय बाजारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एक जानेवारीपासून पोलिस आयुक्तांनी पुणे शहरात हेल्मेटसक्ती लागू केली असून हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीचालकांना ठिकठिकाणी चाैकात अडवून त्यांना पावत्या दिल्या जात आहेत. हेल्मेटविरोधी कृती समिती आणि नागरिकांकडून या कारवाईला तीव्र विरोध होत असतानाही केवळ १८ दिवसांतच एक लाख ३६ हजार ३२० प्रकरणांत कोट््यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

 

रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण व अपघातत मृत अथवा जखमी होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा दुचाकीवर हेल्मेट बंधनकारक दाखला देत पुणे शहरात कडक कारवाईचे संकेत दिले होते. त्यामुळे विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी एकत्रित येत हेल्मेट विरोधी कृती समिती स्थापन केली. अरुंद रस्ते, स्मार्ट सिटीची सुरू असलेली कामे, मेट्रोकरिता खोदण्यात आलेले रस्ते यामुळे २० ते ३० किलोमीटरपेक्षा अधिक वेग दुचाकींचा शहरात नसताना हेल्मेटसक्ती कशाकरिता, असा प्रश्न कृती समितीचे उपस्थित केला. पुण्यात सुमारे २७ लाख दुचाकी असून त्याची संख्या दिवसागणिक वाढतच असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. 

 

हेल्मेट घालणाऱ्यांचे प्रमाण ६० ते ७० टक्क्यांवर 
वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विजय बाजारे म्हणाले, जानेवारी महिन्यात आतापर्यंत एक लाख ३६ हजार ३२० केसेस सीसीटीव्ही आणि २२ वाहतूक विभागांमार्फत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५३ हजार ६९८ केसेस या सीसीटीव्हीद्वारे तर वाहतूक विभागांमार्फत प्रत्यक्ष रस्त्यावर ८२ हजार ६२२ दंड पावत्या करण्यात आल्या आहेत. रिक्षा, कार अशा वाहनांना हेल्मेट सक्तीच्या पावत्या गेल्याची बाब खरी असून अशा प्रकारच्या घटना एक लाख प्रकरणांत केवळ १० ते १५ आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...