Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Help for Kerala flood victims

केरळ पूरग्रस्तांसाठी रोटरीची विविध भागांतून मदत फेरी

प्रतिनिधी | Update - Aug 27, 2018, 11:21 AM IST

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रोटरी क्लबच्या वतीने रविवारी दुपारी मदत फेरी काढण्यात आली.

  • Help for Kerala flood victims

    सोलापूर- केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रोटरी क्लबच्या वतीने रविवारी दुपारी मदत फेरी काढण्यात आली. चार पुतळा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी फेरीला हिरवा झेंडा दाखवून उद््घाटन केले. सामान्य नागरिक ते व्यावसायिकांपर्यंत साऱ्यांनीच उत्स्फूर्त मदत केली.


    रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने या फेरीचे आयोजन केले होते. मराठवाडा, सोलापूर, सातारा, अहमदनगर आदी शहरांत एकाच वेळी ही फेरी काढण्यात आली. सोलापुरात याची सुरुवात चार पुतळा परिसर येथून झाली. फेरीला सुरुवात होताच मुसळधार पाऊस झाला. मात्र पावसाची तमा न बाळगता फेरी सुरूच राहिली. ही फेरी सरस्वती चौक, दत्त चौक, सोन्या मारुती परिसर, जुनी फौजदार चावडी, माणिक चौक, मधला मारुती, पश्चिम मंगळवार पेठ, बाळीवेस, मल्लिकार्जुन मंदिर, पंजाब तालिम मशीद, चौपाड, नवी पेठ, भागवत टॉकीज, नवी वेस पोलिस चौकी, सरस्वती चौकमार्गे पुन्हा चार पुतळा येथे समाप्त झाली. या मदत रॅलीत ७२ जणांचा सहभाग होता. सहभागी तरुण हातात मोठे खोके घेऊन त्यात आर्थिक मदत स्वीकारत होते. तसेच रिक्षावरील ध्वनिक्षेपकावरून मदतीसाठी आवाहन करण्यात येत होते.


    या वेळी विष्णू मोंढे, झुबीन अमारिया, वंदना कोपकर, रमेश अग्रवाल, पवन मोंढे, संतोष सुरवसे, आदी उपस्थित होते. रोटरीच्या वतीने ३० ऑगस्टपर्यंत मदत स्वीकारली जाणार आहे. यानंतर ते केरळमधील पूरग्रस्तांसाठी पाठवली जाईल. याला रोटरी इंटरनॅशनलकडून मदत मिळणार असल्याचे विष्णू मोंढे यांनी सांगितले.

Trending