आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ- युद्धात अथवा विविध देशविघातक कारवाईत वीरमरण आलेल्या तसेच अपंगत्व आलेल्या सैनिक अथवा त्यांच्या परिवारासाठी भारतीय सैन्याने युद्ध अपंग सैनिक वर्ष म्हणून २०१८ ला जाहीर केले आहे. देशभरात यानिमित्त विविध स्वरूपाची मदत सैन्याच्या वतीने केली जात आहे. शहिदांच्या वारसांना नोकरी मिळवून देणे, वैद्यकीय मदत, माजी सैनिकांच्या समस्यांचे निराकरण करणे यासह अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. यवतमाळ येथे रविवारी (१९ ऑगस्ट) चारशे माजी सैनिक, आठ वीरपत्नी आणि एक वीर पित्याचा गौरव औरंगाबाद येथील स्टेशन कमांडर ब्रिगेडीयर डि. के. पात्रा यांच्या हस्ते करण्यात आला.
माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन औरंगाबाद येथील ३४० मध्यम तोफखाना रेजिमेंटच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात माजी सैनिक, वीर नारी व वीर पिता यांचा ब्रिगेडीयर पात्रा, कर्नल पीयूष बिष्ट यांच्या हस्ते गौरव केला. मेजर परमजितसिंह आणि ब्रिगेडीयर पात्रा यांनी सैनिक मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले.. कार्यक्रमात यवतमाळचे माजी सैनिक कॅप्टन दिनेश तटवाडी, निवासी उपजिल्हाधिकारी एन. फुलझेले यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले. ३४० मध्यम तोफखाना रेजिमेंटच्या शिक्षण विभागातील हवालदार प्रकाश गायकवाड यांनी माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून कुटुंबाच्या कल्याणासंबंधीच्या लाभाच्या योजनांची माहिती दिली. यानिमित्त औरंगाबाद येथील सैनिक रुग्णालयाचे कॅप्टन प्रणव कुलकर्णी यांनी आरोग्याच्या समस्यांविषयी माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या. विविध लाभाच्या योजना अंशदायी आरोग्य योजनेतील अडचणींवर चर्चा केली. औरंगाबाद येथील सैन्य रुग्णालयाचे कॅप्टन प्रणव कुलकर्णी यांची मार्गदर्शन केले. कर्नल बिष्ट यांनी आभार तर लेफ्टनंट कर्नल नेत्रजित चोंगथम यांनी आभार मानले. कार्यक्रमात जिल्हा सैनिक कल्याण विभाग, सैन्य भरती कार्यालय, सामान्य प्रशासन, सैनिक सहायता केंद्र, बॅक, सीएसडी कॅन्टीन विभाग, आरोग्य विभाग आदींचे विभागप्रमुखांची उपस्थिती होती. त्यांनी आपल्या विभागाच्या अडचणी दूर केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.