आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमा मालिनींचा बर्थडे : स्वतःचा पहिला चित्रपट बघून खूप रडल्या होत्या हेमा, डिंपलमुळे पहिल्यांदा सावत्र मुलासोबत झाले होते बोलणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची 'ड्रीमगर्ल' अर्थातच अभिनेत्री हेमा मालिनी यांनी वयाच्या 71 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 16 ऑक्टोबर 1948 रोजी  चेन्नईच्या अम्मनकुडी येथे जन्मलेल्या हेमा यांनी 1963 मध्ये तामिळ फिल्म 'इधु साथियम'द्वारे आपल्या अभिनय करिअरचा श्रीगणेशा केला होता. या चित्रपटाशी निगडीत एक गोष्ट आजही हेमा विसरु शकल्या नाहीत. फिल्ममेकरने एकदा मंचावर हेमा यांचा डान्स बघितला होता. तो डान्स बघून ते इम्प्रेस झाले होते आणि त्यांनी हेमा यांना त्यांच्या चित्रपटासाठी साइन केले. चित्रपटात हेमा यांची भूमिका स्टेजवर मैत्रिणींसोबत डान्स करण्याची होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर हेमा त्यांच्या आजोबांसोबत (आईचे वडील) चित्रपट बघायला गेल्या. पण चित्रपटातील हेमा यांचा संपूर्ण रोलच कट करण्यात आल्याचे बघून त्या हैराण झाल्या. त्यानंतर त्या हमसून हमसून रडल्या होत्या.


राज कपूर यांना कॉपी केल्यानंतर मिळाला होता पहिला बॉलिवूड चित्रपट....
हेमा यांनी 1968 मध्ये ‘सपनों के सौदागर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटात राज कपूर यांना कॉपी करावे लागले होते, त्यानंतरच त्यांना पहिला हिंदी चित्रपट मिळाला होता. एका मुलाखतीत हेमा यांनी याविषयी सांगितले होते, ''स्क्रीन टेस्टसाठी मला आरके स्टुडिओत बोलावण्यात आले होते. मी तेथे पोहोचली तेव्हा दिग्दर्शक महेश कौल यांच्यासोबत स्वतः राज साहेब तिथे हजर होते. महेशजींच्या माध्यमातून मी राज साहेबांकडे विनंती केली, त्यांनी मला नेमके काय करायचे आहे, हे  अभिनय करुन दाखवावे, म्हणजे मला नेमके काय करायचे हे मला समजेल. माझे बोलणे ऐकून महेशजी हैराण झाले होते. पण राज साहेब म्हणाले होते, ''काही हरकत नाही, तिला ठाऊक नाही, त्यामुळे मी करुन दाखवतो.'' राज कपूर यांनी तेव्हा ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटातील एका संवादावर अभिनय करुन दाखवला होता, हा संवाद पद्मिनी कोल्हापुरेने चित्रपटात म्हटला होता. राज साहेबांनी ज्या नजाकतने संवाद म्हटला, तसाच हुबेहुब अभिनय हेमा यांनीही केला. हेमा म्हणतात, ''मी राज साहेबांची नकल करुन पास झाली आणि मला ‘सपनों के सौदागर’साठी फायनल करण्यात आले होते.''

 

हेमा यांच्यावर ओरडायचे दिग्दर्शक...
राज कपूर यांना कॉपी करुन हेमा मालिनी यांना चित्रपट मिळाला खरा, पण त्यांच्या अडचणी अजून संपल्या नव्हत्या. दिग्दर्शक महेश यांच्याविषयी हेमा यांनी सांगितले होते, "ते कायम माझ्यावर ओरडत असायचे. पण ते खूप चांगले व्यक्ती होते. माझ्या चुकांवर ते मला ओरडायचे. मी माझ्या आईला म्हणायची,‘मला मद्रासला परत घेऊन चल.'' जेव्हा ही गोष्ट महेशजींना समजली, तेव्हा त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलावले आणि म्हणाले, ''बेटा तू डान्समध्ये कुशल आहेस, मला एक सांग जर एखाद्याला हाक मारायची असेल, तर ती भरतनाट्यममधून कशी देशील?’ माझ्या हाताचे इशारे बघून ते म्हणाले, ‘फक्त, हेच तुला तोंडाने बोलायचे आहे.’ बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणा-या हेमा यांनी हळूहळू संवाद शैली आणि अभिनयात पारंगत झाल्या.

 

एका अभिनेत्रीमुळे सावत्र मुलगा सनीसोबत पहिल्यांदा बोलल्या होत्या हेमा...
हेमा मालिनी त्यांचा सावत्र मुलगा सनी देओलसोबत पहिल्यांदा तेव्हा बोलल्या होत्या, जेव्हा त्या 'दिल आशना है' (1992) या चित्रपटाच्या दिग्दर्शिका होत्या. 'बियोंड द ड्रीम गर्ल' या बायोग्राफीत हेमा यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही खुलासे केले आहेत. पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार, हेमा आणि सनी देओल यांच्यात पहिल्यांदा बोलणे हे अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यामुळे झाले होते. 'दिल आशना है'मध्ये डिंपल कपाडिया यांनी दिव्या भारतीच्या आईची भूमिका साकारली होती. हेमा यांना डिंपल आणि मिथून चक्रवर्ती यांच्यासोबत पॅराग्लाइडिंगचे काही सीन शऊट करायचे होते. हे सीन प्लेनमधून शूट होणार होते. शूटिंगच्या काही दिवसांपूर्वी पायलटचा अपघात झाला होता. या घटनेमुळे डिंपल खूप घाबरल्या होत्या. त्यांनी त्यांच्या मनात असलेली भीती सनी देओल यांच्याकडे बोलून दाखवली होती. त्यानंतर हेमा सनी तत्काळ सेटवर आला आणि हेमा मालिनींना भेटला. त्यावेळी हेमा यांनी सनीला विश्वास दिला की, डिंपलला काहीही होणार नाही. हेच हेमा आणि सनी यांच्यातील पहिले बोलणे होते. 1979 मध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत लग्नानंतर 13 वर्षांनी हेमा त्यांचा सावत्र मुलगा सनीसोबत बोलू शकल्या होत्या. असे म्हटले जाते, की त्याकाळात सनी आणि डिंपल यांचे अफेअर सुरु होते.  

 

बातम्या आणखी आहेत...