आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीश हेमा मालिनींवर कोट्यधींचे कर्ज; 2 कोटींचे दागिने, 5 वर्षांत 71 कोटींनी वाढली संपत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा - लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी 249 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले. यात 114 कोटींची संपत्ती त्यांच्याच नावे आहे. तर पती आणि अभिनेता धर्मेंद्र यांच्या नावे 135 कोटींची मालमत्ता आहे. हेमा मालिनी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना ही माहिती दिली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्याकडे 178 कोटींची प्रॉपर्टी असल्याचे सांगितले होते. गेल्या 5 वर्षांत त्यामध्ये 71 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.


70 वर्षांच्या 70 हेमा मालिनी यांनी आपल्या अॅफिडेविटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 5.61 लाख रुपये कॅश आहेत. तर धर्मेंद्र यांच्याकडे 32,500 रुपयांची रोकड आहे. हेमा मालिनी यांच्या बँक खात्यात जवळपास दीड कोटी रुपये जमा आहेत. या व्यतिरिक्त विविध कंपन्यांमध्ये त्यांच्या नावाचे 7 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. हेमा यांनी आपल्या नावे 8 कोटी रुपयांचे कर्ज देखील घेतले आहे.


अब्जाधीश हेमा मालिनींवर कोट्यधींचे कर्ज
हेमा यांच्याकडे 1 कोटी 11 लाख 95 हजार 700 रुपयांची स्वतःची प्रॉपर्टी आहे. तर धर्मेंद्र यांच्याकडे 23 कोटी 85 लाख 12 हजार 86 रुपयांचा बंगला आणि त्यातील वस्तू आहेत. यासोबतच अब्जाधीश हेमा मालिनींवर 6 कोटी आणि पती धर्मेंद य़यांच्यावर 7 कोटी रुपयांचे कर्ज आहे.


2 कोटींचे दागिने अशी करतात कमाई
शपथपत्रात हेमा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांच्याकडे 1,1,07,962 रुपयांच्या कार आहेत. तर 2 कोटी 71 लाख रुपयांचे दागिने सुद्धा आहेत. मुंबईच्या विले पार्ले येथे राहणाऱ्या हेमा मालिनी यांच्या उत्पन्नाची साधने व्यवसाय, भाडे आणि व्याज इत्यादी सांगण्यात आले आहे. 2012 मध्ये त्यांना उदयपूर येथील विद्यापीठाकडून पी.एचडीची मानद उपाधी मिळाली होती.