आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hema Malini Shared For The First Time Her Birthday Experience, Saying 'I Miss Birthday Celebrations With Amma Appa'

हेमा मालिनी यांनी पहिल्यांदा शेअर केले आपल्या वाढदिवसाचे अनुभव, म्हणाल्या - 'अम्मा-अप्पासोबत साजरे केलेले बर्थडे मिस करते' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : हेमा मालिनी 71 वर्षांच्या झाल्या आहेत. 16 ऑक्टोबर 1948 ला जन्मलेल्या हेमा मालिनी यांनी काही वर्षांपासून एक नियम बनवला आहे की, कुटुंब नाती आणि वाढदिवस यांसारख्या खूप खाजगी गोष्टींबद्दल त्या मीडियासोबत कधीही बातचीत करणार नाहीत. मात्र दैनिक भास्करसोबत खास बातचीत करताना त्यांनी हा नियम थोडा बाजूला ठेवला. 

प्रश्न : तुमच्या वाढदिवशी मिळालेली एखादी भेटवस्तू जी तुम्हाला आठवत असेल ?
उत्तर : माझ्या मुली (ईशा, अहाना) आणि पती धर्मेंद्रजी यांच्याकडून काही असे गिफ्ट्स मिळाले आहेत. पण या सर्व पर्सनल गोष्टी आहेत. मी खुल्या पुस्तकाप्रमाणे हे सर्वांसमोर मांडू शकत नाही. धरमजींकडून मिळालेले काही गिफ्ट्स मी सांभाळून ठेवले आहेत आणि हे माझ्यासाठी खूप जास्त मोलाचे आहेत. 

प्रश्न : आयुष्यातील आठवणीत असलेला वाढदिवस कोणता ?
उत्तर : जेव्हा माझे आई वडील (जया लक्ष्मी चक्रवर्ती आणि व्हीएस रामानुजम चक्रवर्ती) या जगात होते आणि मी लहान होते, तेव्हाचे सर्वच वाढदिवस विशेष असायचे. त्यांना आजही मिस करते. आईवडिलांसोबत वाढदिवस साजरा करण्याची मजाच काही वेगळी असते. चित्रपटात काम सुरु केल्यानंतर अनेक वाढदिवशी मी शूटिंगमध्ये व्यस्त असायचे. त्यामुळे कधी असा वेगळा वाढदिवस साजरा केलाच नाही. पण यादरम्यानही सेटवर माझा वाढदिवस पूर्ण दिवस साजरा व्हायचा आणि पार्टी व्हायची. 

प्रश्न : आता तुमचे बर्थडे सेलिब्रेशन कसे होते ?
उत्तर : खरे सांगायचे तर आता वाढदिवस केवळ माझ्या नातवांसाठीच साजरा केला जातो. नाहीतर या वयात आपण सेलिब्रेशनवर एवढे लक्ष कुठे देतो. मुलांना वाढदिवस, पार्टी वगैरे करण्यात खूप मजा येते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत वेळ घालवणे पसंत करते. त्यांना पाहून आणि त्यांच्यासोबत खेळून मनाला शांतता मिळते. आता मी जास्त काळ मथुरामध्येच राहाते. तिथे काम करते आणि काही वेळेसाठी मुंबईला येऊ शकते आणि जास्तीत जास्त वेळ मुलांसोबतच घालवते. आपण नेहमी लहान मुलांकडून शिकले पाहिजे की, ते कसे खुश राहतात आणि कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला व्यस्त ठेवतात. मीसुद्धा माझ्या नातवांकडून हेच शिकते. 

प्रश्न : या वयात एवढी फिटनेस आणि सुंदरतेचे रहस्य काय आहे ?
उत्तर : मला वाटते की, व्यस्त राहणे आणि काम करणेच सर्वांना फिट ठेवते. वाढत्या वयासोबत जर तुम्ही सुस्त होऊन बसले तर काहीच फायदा होत नाही. तुमचे शरीर आणि डोक्याला काही ना काही काम देत राहिले पाहिजे नाहीतर तुम्हाला फार उदास वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी निगेटिव्हिटीपासून दूर राहिले पाहिजे.

प्रश्न : तुम्हाला अभिनय क्षेत्रात पुन्हा परतण्याची इच्छा आहे का ?
उत्तर : (या प्रश्नावर त्या खूप मनमोकळ्या हसल्या आणि मग उत्तर दिले...) इंडस्ट्रीमध्ये एवढ्या सुंदर आणि नवीन अभिनेत्री आल्या आहेत. अशात आम्हाला पाहणे कुणाला आवडेल. तरीदेखील जर एखादी चांगली भूमिका मिळाली तर मी नक्की करेल. कारण अभिनयदेखील एक काम आहे आणि मला काम करणे नेहमी आवडते. 
 

बातम्या आणखी आहेत...