आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातून प्रथमच हेमंत गाेयल केबीसीत; जिंकलेल्या पैशातून बांधणार हक्काचे घर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमाेर केबीसीत हाॅट सीटवर बसणारा हेमंत गाेयल हा शहरातील पहिला ठरला. बच्चन यांच्यासमाेर हाॅट सीटवर बसल्यानंतर त्यांनी दिलेली मैत्रीपूर्ण वागणूक नेहमी लक्षात राहील. यातून जिंकलेल्या ३ लाख २० हजार रुपयांमधून हक्काचे घर बांधणार अाहे, असे हेमंत याने सांगितले. 

धुळयातील मिल परिसरात राहणारा हेमंत गोयल-अग्रवाल याने नुकतीचे ‘कौन बनेगा कराेडपती’ या शाेमध्ये धडक दिली. या खेळातून हेमंतने ३ लाख २० हजार रुपये जिंकले. ताे सर्वसामान्य कुुटुंबातील आहे. हेमंत याचे बीकॉम व डिप्लोमा इन टेक्स्ट लॉ झाले आहे. शिवाय एका सीए फर्ममध्ये तो कामाला आहे. त्याचे वडील नंदलाल अग्रवाल हे खासगी ठिकाणी नोकरी करतात, तर आई मनोरमा या गृहिणी आहेत. भाडेतत्त्वावर राहताना मालकीच्या घराची नेहमीच इच्छा असायची. परंतु आर्थिक अडचणीमुळे हे स्वप्न अवघड होते. स्वत:च्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी केबीसीत एन्ट्रीसाठी प्रयत्न करत होतो. दुसऱ्या वेळी ऑनलाइन प्रश्नाला उत्तर दिल्यामुळे निवड झाली. केबीसीमधून त्या दिवशी फोन आल्यानंतर आनंद झाला. त्याहीपेक्षा मोठा आनंद महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमाेर बसण्याचा झाला. पहिल्या दिवशी दोन तास व दुसऱ्या दिवशी अर्धा तास त्यांच्यासमक्ष हॉट सीटवर होतो. महानायक बच्चन यांचा स्वभाव, बोलणे सारेच मैत्रीपूर्ण आहे. अगदी रोज भेटणाऱ्या मित्राप्रमाणे त्यांनी आस्थेवाईक चौकशी केली. प्रश्नांची उत्तरे देताना १२ व्या प्रश्नाचे उत्तर चुकल्यामुळे तीन लाख २० हजार रुपये जिंकता आले. 
 

डीपीवर अमिताभ, हक्काची फिलिंग...
महानायक अमिताभ बच्चनसोबतचे छायाचित्र हेमंत याने व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवले आहे. शिवाय त्यांच्यासोबतचे व्हिडिओही तो इतरांना आवर्जून सेंड करत आहे. खेळातून आलेल्या रकमेने घराचे स्वप्न पूर्ण होईल. हक्काच्या घरात राहण्याचा आनंद मिळेल.

बातम्या आणखी आहेत...