आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमंत सोरेन म्हणाले - नोटाबंदी असो वा एनआरसी-सीएए, लोकांना रांगेत उभे करण्याच्या सवयीने भाजपला सत्तेपासून दूर नेले

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • सोरेन म्हणाले - लोकांनी रोजगार शोधावा की, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे शोधावी
  • "झारखंड अमेरिका किंवा ब्रिटन नाहीये, हे मागासलेले राज्य आहे आणि आम्ही गरिबांच्या घरी जाऊन अडचणी दूर करू"

रांची - झारखंड विधानसभा निवडुकांच्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आणि राजद महाआघाडीला जनादेश मिळत असल्याचे दिसत आहे. महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि झामुओचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेनयांनी दैनिक भास्करसोबत विशेष बातचीत केली. यावेळी ते म्हणाले की, भाजप कोणत्या ना कोणत्या कारणामुळ जनेतला रांगेत उभी करत आहे. मग ते नोटबंदी असो, एनआरसी असो किंवा सीएए असो. त्यांचे कल्याण कोण करू शकेत हे जनतेला समजले आहे. सोरेन म्हणाले की, जनतेला रांगेक उभ्या करण्याच्या सवयीने भाजपला सत्तेपासून दूर केले आहे.  

प्रश्न : अमित शाहांनी आरोप केला की, तुम्ही सत्तेसाठी झारखंड विरोधी काँग्रेस आणि राजदसोबत आघाडी केली?


उत्तर : तेव्हा शाह काय करत होते? ते येथे कशासाठी भांडत होते? समाजसेवा करायची असेल तर त्यांच्याकडे बरीच संसाधने आहेत. जर माझी माहिती चुकीची नसेल तर हे लोक निवडणुकीसाठी 27 हजार कोटी बजेट ठेवतात. जर ते सत्तेसाठी लढत नव्हते तर निवडणुकीत काय करीत होते?प्रश्न : बहुमताचे श्रेय कोणाला देणार? अशी कोणती कारणे होती ज्यामुळे लोकांनी डबल इंजिनऐवजी सिंगल इंजिन निवडले?


उत्तर : या विजयाचे श्रेय राज्यातील जनतेला देईल. जनतेने अडचणी सोडवण्यासाठी असे पक्ष आणि राजकीय पक्षाला निवडले. ज्यांनी राज्यासाठी बलिदान दिले. राहिली गोष्ट डबल इंजिनला नाकारण्याची तर राज्याला मी जितक्या जवळून जाणतो आणि माझा पक्ष समजतो. मला नाही वाटत की इतर कोणी इतक्या जवळून ओळखत असेल. या राज्याच्या निर्मितीचे श्रेय देखील झारखंड मुक्ती मोर्चाला जाते. 

प्रश्न : मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय कोणता असेल?


उत्तर: एका दृष्टीने राज्य चालवणे पुरेसे नाही. यासाठी अनेक व्यापक स्तरांतून जावे लागते. ज्यामध्ये तरुण, शेतकरी, महिला, व्यापारी, शिक्षण आणि रोजगार असेल. झारखंड म्हणजे अमेरिका किंवा लंडन नाही की येथे काम करण्याची गरज नाही. हे अत्यंत मागसलेले राज्य आहे. आम्ही गरिबांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणार आहोत. शिक्षण, आरोग्य आणि समृद्धीला आमचे पहिले प्राधान्य असेल.  प्रश्न : एनआरसी आणि सीएएमध्ये आपल्याला काय वाईट आणि कोणते चांगले दिसत आहे?


उत्तर : देशात कामधंदे सोडून रांगेत उभे राहा आणि सिद्ध करा की आपण भारतीय आहोत. ज्या देशात 18 कोटी लोक मजूर आहेत, ज्यांच्याकडे जमीन किंवा कागदपत्रे नाहीत ते काय पुरावा दाखवणार? जनतेने कागदपत्रे शोधावीत कि रोजगार हे भाजने सांगावे? यांना नेमके काय करायचे आहे? लोकांनी काम सोडून रांगते उभे रहावे अशी यांची इच्छा आहे का? जसे की, नोटबंदीच्या काळात लोकांना रस्त्यावर मारले. आज देशाची परिस्थीत काय आहे हे भाजपने सांगावे. भीती दाखवून कायदे लादले जात आहेत. यामध्ये चांगले काय आहे. असे काय होते की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इंटरनेट बंद करावे लागत आहे? लोक रस्त्यावर उतरले आहेत. भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी एक दिवस सर्वांनाच कागदपत्रे घेऊन रांगते उभे राहावे लागेल. भाजप देशातील मुद्द्यांवरून भटकत चालली आहे. आम्ही सकारात्मक अजेंडासह जनतेजवळ गेलो. भाजप मात्र एनआरसी आणि राम मंदिराचा मुद्दा कौतूक करत होते. यांना सरदार पटेल आणि रामाच्या आदर्शांशी काहीही संबंध नाही. यांना फक्त आपले राजकारण आणि वोट बँक महत्वाची वाटते. हे जनतेमध्ये भांडणं लावतात आणि मतं मिळवतात. 

 

प्रश्न : झारखंड नक्षलग्रस्त राज्य आहे. या समस्येचा सामना कसा कराल?

उत्तर : साधारण गावकऱ्यांना देखील नक्षलवादी बनवले गेले आहे. आजच्या घडीला येथील तुरुंगात निष्पाप लोक बंद आहे. रोजगार न मिळाल्यास लोक काय करतील? यामुळे रोजगाराला आमचे पहिले प्राधन्य असेल.  प्रश्न : झामुमो आणि काँग्रेस आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल का?  कर्नाटकातील सरकार टिकले नाही.

उत्तर : आम्ही एकदा छोटा कार्यकाळ पूर्ण केला होता. मला हा अनुभव माहित आहे, मग ते पूर्ण का होणार नाही.प्रश्न : प्रचारात मोदी-शाहांनी तुमच्यावर आरोप केले की, काँग्रेस-झामुओच्या सरकारने झारखंडसाठी काहीच काम केले नाही. उलट त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विकासाची गंगा वाहिली? 


उत्तर : तुमच्या प्रश्नातच उत्तर लपलेले आहे. या राज्याचे विभाजन झाल्यानंतर सर्वात जास्त सरकार कोणी चालवावे, असा सवाल त्यांना केला पाहिजे.