आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमंत सोरेन यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, राहुल-ममतांसह बड्या नेत्यांची उपस्थिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हेमंत सोरेन यांनी जुलै 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती
  • काँग्रेसचे रामेश्वर उरांव, आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भोक्ता मंत्रिपदाची घेणार शपथ

रांची - झारखंड मुक्ति मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली. रांचीच्या मोरहाबादी मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळई काँग्रसे नेता राहुल गांधी, ममता बॅनर्जी, भूपेश बघेल, तेजस्वी यादव यांसह बड्या नेत्यांची उपस्थिती होती. या समारोहासाठी 14 पक्षांच्या 30 नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आले होते. हेमंत यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि लोहरदगाचे आमदार रामेश्वर उरांव, आलमगीर आलम आणि राजदचे आमदार सत्यानंद भोक्ता यांनी मंत्रिपदाची शपथ घेतील. 
 

उपमुख्यमंत्री आणि सभापतीपदावरून दोन्ही पक्षात वाद 

झामुमो आणि काँग्रेस यांच्यात उपमुख्यमंत्री, सभापती आणि मंत्रीपदावरून शनिवारी रात्री उशिरापर्यंत वाद सुरू असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे मंत्रिमंडळाचे स्वरूप निश्चित होत नाहीय. काँग्रेसची विधानसभा अध्यक्षपदासह उपमुख्यमंत्रिपदाची मागणी आहे. मात्र झामुमो यासाठी तयार नाही. 

15 जानेवारीनंतर अन्य आमदार घेतील शपथ 

माहितीनुसार, हेमंत मंत्रिमंडळातील उर्वरित मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, 30 डिसेंबरला दिल्लीत बोलवण्यात आलेल्या एका बैठकीत मंत्र्यांच्या नावावर आघाडीच्या नेत्यांची सहमती होऊ शकते. यानंतर अन्य मंत्री 15 जानेवारीनंतर पद आणि गोपनियतेची शपथ घेतील.