आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIDS पेक्षाही घातक आहे हा आजार, जगभरात दरवर्षी 8 लाख लोकांचा होतो मृत्यू; ही 6 लक्षणे दिसताच घ्या डॉक्टरांकडे धाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- 1 डिसेंबरला जगभरात एड्स डे साजरा करतात. या दिवशी एड्सबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवली जाते. पण, एक असा आजार आहे ज्याला डॉक्टर्स आणि एक्सपर्ट एड्सपेक्षा जास्त घातक मानतात. या आजाराचे नाव आहे हेपेटायटिस. हेपेटायटिस B किंवा C, साइलेंट किलर या नावाने ओळखला जातो. WHO च्या रिसर्चनुसार हेपेटायटिस B मुळे जगभरात 8 लाख लोकांचा मृत्यु होतो, जो की एड्सपेक्षा जास्त आहे.

 

या आजाराबद्दल जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबईच्या हेपेटोलॉजिस्ट डॉ. जयश्री शाह आणि किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटी, लखनऊच्या मेडिसिन विभागाचे असोसि‍एट प्रोफेसर डॉ. अवि‍नाश अग्रवाल यांनी सांगितले आहे की हेपेटायटिस आहे तरी काय.

 

काय आहे हेपेटायटिस?

हा एक असा आजार आहे जो शरीरात HBV व्हायरसच्या संक्रमणामुळे होतो. हा व्हायरस शरीरात इन्फेक्टेड रक्ताच्या ट्रांसफरमुळे किंवा इन्फेक्टेड जोडीदारासोबत इंटरकोर्स केल्यामुळे पसरतो. यामुळे लिव्हरमध्ये इन्फेक्शन पसरले जाते, त्यासोबतच लिव्हर फेल्यूअर किंवा कँसर सारखी परिस्थिती निर्माण होते.

 

हेपेटायटिस अनेक प्रकारचे आहेत, यात A, B, C, D आणि E आहेत. त्यात C डेल्टा व्हायरस आहे. त्याची लक्षणे B सारखेच आहेत, तर A आणि E सगळ्यात कॉमन आणि सर्वात जास्त लागण होणारे आहेत. घाण पाण्यामुळे हा आजार पसरतो. काविळ झाल्यावर अश प्रकारचेस संक्रमण होते.

 

असा पसरतो हा आजार

> एकापेक्षा अनेक व्यक्तींसोबत विना सुरक्षेचे संबंध

> संक्रमित व्यक्तीचे रेजर यूज करने

> ब्लड ट्रांसफ्यूजनच्या प्रोसेसमध्ये


हेपेटायटिसची लक्षणे

1. नेहमी थकवा आणि ताप

2. भूक न लागणे 

3. पोटात दुखणे

4. पिवळी लघवी होणे

5. त्वचा आणि डोळे पिवळे पडणे

6. काविळ होणे

 

असा करा उपाय

> रक्त घेण्यापूर्वी त्याचे निट परिक्षण व्हावे

> डिस्पोजेबल सिरींजचा उपयोग करून नंतर ती फेकून द्यावी

> लक्षणे आढळल्यास डॉक्टर सोबत कंसल्ट करा

 

बातम्या आणखी आहेत...