Home | Maharashtra | Vidarva | Amravati | Her husband's arrest in the Tiharbano murder case

अमरावती : बहुचर्चित ताहेराबानो हत्या प्रकरणात पतीला अटक

प्रतिनिधी | Update - Nov 29, 2018, 11:40 AM IST

पोलिसांना याप्रकरणी ताहेराबानो यांच्या निकटवर्तीयांवरच संशय होता.

  • Her husband's arrest in the Tiharbano murder case

    अमरावती - येथील असीर कॉलनीतील ताहेराबानो यांच्या हत्येप्रकरणी पती हाजी आदिक अहमद (वय ६५) व नोकर नौशाद बेग या दोघांना आज (दि. २८) अटक करण्यात आली. नागपुरी गेट परिसरातील असीर कॉलनीतील रहिवाशी ताहेराबानो (वय ६२) यांची भरदुपारी १८ नोव्हेंबर रोजी हत्या करून पाव किलो सोने व ८३ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली होती.

    दरम्यान, या घटनेला तब्बल दहा दिवस उलटूनही ताहेराबानो यांच्या मारेकऱ्याचा पत्ता लागत होता. पोलिसांना याप्रकरणी ताहेराबानो यांच्या निकटवर्तीयांवरच संशय होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. मारेकऱ्यांनी हत्येपूर्वी घरातील सीसीटिव्ही कॅमेरेही बंद करून ठेवले होते. गाडगेनगर पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करून हाजी आदिल अहमद यांच्या स्वस्त धान्याच्या दुकानात काम करणाऱ्या नौशाद बेगला ताब्यात घेतले होते. ताहेराबानो यांच्या घराच्या दिशेने असणाऱ्या एका सीसीटिव्ही कॅमेराचे फुटेज पोलिसांना मिळाले होते. हाच सुगावा पोलिसांना तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या फुटेजमध्ये घटनेच्या आधी व नंतर ताहेराबानो यांच्या घराच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले होते. या प्रमुख संशयावरून पोलिसांनी ताहेराबानो यांचा पती हाजी आदीक अहमद याला अटक केली. तपास पोलिस करीत आहेत.

Trending