आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2020 मध्ये रिलीज होणार 'हेरा फेरी' आणि 'ओह माय गॉड'चे सिक्वेल, परेश रावल यांनी केले ट्विट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क:  'हेरी फेरी' आणि  'ओह माय गॉड' या हिट विनोदी चित्रपटांचा सिक्वेल पुढील वर्षी रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुढील वर्षी पावसाळ्यापूर्वी दोन्ही चित्रपट येत आहेत, असे त्यांनी ट्विट केले आहे. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटांची गणना

  • बॉलिवूडमधील मोठ्या हिट चित्रपटात केली जाते.

परेश रावल यांच्या ट्विटनुसार 'हेरी फेरी', 'ओह माय गॉड' या दोन्ही चित्रपटांचा सीक्वेल पुढील पावसाळ्यापूर्वी प्रेक्षकांसमोर येईल. विशेष म्हणजे ब-याच दिवसांपासून चित्रपटांच्या सिक्वेलचा अंदाज वर्तविला जात होता.  दोन्ही चित्रपटांमध्ये बॉलिवूडची हिट कॉमेडी जोडी परेश रावल आणि अक्षय कुमार यांनी अभिनय केला होता.

  • बॉक्स ऑफिसवर केली होती बंपर कमाई

2000 मध्ये रिलीज झालेल्या 'हेरा फेरी'मध्ये परेश यांच्या व्यतिरिक्त सुनील शेट्टी, अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. कुलभूषण खरबंदा, गुलशन ग्रोव्हर आणि ओमपुरी यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 22 कोटींचा व्यवसाय केला होता. यानंतर 'फिर हेरा फेरी' चित्रपटाचा दुसरा भाग वर्ष 2006 मध्ये प्रदर्शित झाला. 18 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची उलाढाल 69 कोटींपेक्षा जास्त होती. 'ओह माय गॉड' 2012 मध्ये रिलीज झाला होता. परेश रावल यांनी या चित्रपटात नास्तिक व्यक्तीची भूमिका केली होती, तर अक्षय कुमार भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत होता.

बातम्या आणखी आहेत...