आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर : क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते, वाचा 60 जणांचे प्राण हिरावणाऱ्या अपघाताला काय ठरले कारणीभूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - पंजाबच्या अमृतसर मध्ये दसऱ्याच्या दिवशी रावण दहन सोहळ्यादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताने जवळपास 60 जणांचा प्राण हिरावला. सगळीकडे उत्सवाचे वातावरण असताना काही सेकंदांमध्येच सगळे होत्याचे नव्हते झाले. या अपघातासाठी अनेकांना कारणीभूत धरले जात आहे. काही जणांनी एकमेकांकडे बोट दाखवालया सुरुवातही केली. पण अपघाताच्या खऱ्या कारणाचा शोध घ्यायचा असेल तर घटनेच्या वेळी असलेली परिस्थिती आणि संपूर्ण घटना यांचा सारासार विचार करणे गरजेचे असेल. त्यावरूनच खरी कारणे नेमकी काय हे समोर येऊ शकते. अशाच काही कारणांबाबत आपण येथे जाणून घेणार आहोत. 


1. आयोजनाचा अभाव

वढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याआधी सर्वात महत्त्वाचे असते ती प्रशासनाची परानगी. मात्र या कार्यक्रमासाठी परवानगीच घेण्यात आली नव्हती असे समोर येत आहे. त्यात कार्यक्रम जर रेल्वे रुळाच्या आसपास होत असेल, तर त्यासंदर्भात सूचना देणे किंवा इतर व्यवस्था करणे अपेक्षित होते. पण तसे काहीही झालेले नव्हते. गर्दीचा विचार करून इतर व्यवस्था करण्यात आल्या नव्हत्या. 

 

2.फटाक्यांचा आवाज

फटाक्यांचा आवाज हेदेखिल या अपघातामागचे एक मोठे कारण आहे. रावण दहन होताच फटाक्यांचा कडकडाट सुरू झाला होता. त्यामुळे रेल्वेचा आवाज लोकांना आला नाही असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. त्यामुळे लोक रुळावरून लवकर हटलेही नाहीत. 

 

3. अपुरे पोलिस

कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला होता. त्यातुलनेमध्ये पोलिसांची संख्या कमी होती, असे सांगितले जात आहे. कारण लोक रूळावर उभे असल्याकडे कोणाचे लक्षच नव्हते. पोलिसांची संख्या पुरेशी असती तर या लोकांकडे सर्वांचे लक्ष गेले असते आणि लोकांना हटवले असते. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशीच काही कारणे..

बातम्या आणखी आहेत...