आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात श्रीमंत भिकारी, कुणी कोट्यधीश, कुणाचे चार बंगले तर कोणी चक्क मर्सिडीझचा मालक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिकारी.. कानावर हा शब्द पडताच काहीशा हीन भावनेने आपण त्या व्यक्तीकडे पाहत असतो. रस्त्यावरून जाताना कळकट कपड्यातील भिकारी पाहिल्यानंतर अनेकजण त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे जातात. मात्र अनेकजण दयेच्या भावनेने त्यांना मदत करत असतात. भीक मागणे हा अनेक जणांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग असतो. पण केवळ उदरनिर्वाहाएवढेच हे मर्यादीत नाही. भीक मागण्याची एक इंडस्ट्री आजच्या घडीला चालत असल्याचे म्हटले जाते. काही चित्रपटांतही हा संपूर्ण गोरखधंदा कसा चालतो हे आपण पाहिले आहे. पण त्याचवेळी भीक मागूण अनेक जण लक्षाधीश अगदी अब्जाधीशही झाले आहेत, असे म्हटले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. अशीच काही उदाहरणे आपण आज पाहणार आहोत. जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून इंटरनेटवर प्रसिद्ध असलेल्या काही भिकाऱ्यांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 


सायमन राइट 
लंडमधील हा 47 वर्षीय व्यक्ती दिवसाला जवळपास 8 तास भीक मागतो. वीकेंडला तर तो जास्त वेळ काम करतो म्हणजेच भीक मागतो. यादरम्यान तो सोबत त्याचा कुत्रा घेऊन फिरत असतो. लोकांनी लवकर भीक द्यावी म्हणून मुद्दाम मळलेले कपडे परिधान करणारा सायमन वर्षाकाठी 50 हजार पौंडची कमाई करतो अशी माहिती मिळाली आहे. 


एशा 
जेद्दाहमध्ये भीक मागणारी ही 100 वर्षीय महिला मृत्यूनंतर प्रचंड प्रसिद्ध झाली होती. त्याचे कारण म्हणजे मृत्यूनंतर समोर आलेली तिची संपत्ती. ही संपत्ती होती 10 लाख अमेरिकन डॉलर्सपेक्षाही जास्तची. यामध्ये जवळपास 8 लाख अमेरिकन डॉलरची कॅश, 2 लाख अमेरिकन डॉलरचे दागिने आणि जेद्दाहमधील तिच्या मालकीच्या 4 इमारती. विशेष म्हणजे तिने मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र लिहून मैत्रिणीकडे दिले होते. मृत्यूपर्यंत ते उघडू नये असे त्यात म्हटले होते. तिच्या मृत्यूनंतर हे मृत्यूपत्र वाचले तेव्हा त्यात या संपत्तीचा उलगडा झाला. मृत्यूनंतर तिने सर्वकाही इतर भिकारी आणि रस्त्यावरील बेघर लोकांना दिले. 

 

पुढे वाचा, जगातील अशाच धनाध्य भिकाऱ्यांबाबत...

 

बातम्या आणखी आहेत...