आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरेंनी संजय दत्तला काढले होते तुरुंगाबाहेर, 7 वर्षांनी जेव्हा समोर आले सत्य तेव्हा भडकले होते, म्हणाले होते - त्याला फासावर लटकवा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'ठाकरे' या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी लाँच करण्यात आला. हिंदी आणि मराठीत प्रदर्शित होणा-या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार, बाळासाहेब ठाकरेंवर बॉम्बस्फोटात त्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येतो, त्यावर ते भडकतात. बाळासाहेबांनी या प्रकरणात अडकलेल्या संजय दत्तला तुरुंगांबाहेर काढण्यात सुनील दत्त यांची मदत केली होती. पण सात वर्षांनी त्यांना या गोष्टीचा पश्चाताप झाला होता. 


बाळासाहेब म्हणाले होते, संजय दत्तला फासावर लटकवा, मला फरक पडत नाही...  
- बाळासाहेबांनी 2002 मध्ये सामनात दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, "जर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तविरोधात पुरावे असतील तर मी काही करु शकत नाही. त्याला फासावर लटवले तरी मला त्याने फरक पडत नाही." हा तोच काळ होता जेव्हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील आणि संजय दत्तच्या बातचीतची एक तथाकथित ऑडिओ टेप समोेर आली होती. बाळासाहेबांनी मुलाखतीत पुढे म्हटले होते, "टेपमधील बातचीत बघता मी पुन्हा संजय दत्तची मदत करु शकत नाही." जेव्हा संजय दत्तला तुरुंगाबाहेर काढले होते (1995 मध्ये), तेव्हा त्यांना संजयचे छोटा शकीलसोबत कनेक्शन असल्याचे ठाऊक नसल्याचेही बाळासाहेब या मुलाखती म्हणाले होते. 

 

अखेर का केली होती संजय दत्तची मदत, बाळासाहेबांनी सांगितले होते याचे कारण...  
- बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितले होते, जेव्हा संजय दत्तला AK-56 बेकायदेशीर बाळगल्याप्रकरणी तुरुंगवास झाला होता, तेव्हा इंडस्ट्रीतील बराच पैसा त्याच्यावर लागला होता. त्यामुळे अनेक निर्माते त्यांच्याकडे संजय दत्तला तुरुंगाबाहेर काढण्याची विनंती करण्यासाठी आले होते. ठाकरेंनी पुढे सांगितले होते की, त्यावेळी संजय दत्तजवळ AK-56 मिळाल्याचे सबळ पुरावे नव्हते, त्यामुळे तो तुरुंगाबाहेर येणारच होता. याच कारणामुळे त्यांनी त्याची मदत केली होती. 1995 मध्ये संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनीही बाळासाहेबांकडे संजय दत्तच्या सुटकेसाठी विनंती केली होती. त्यावर ठाकरे सुनील दत्त यांना म्हणाले होते, "ठीक आहे, बघतो मी काय करु शकतो. पण हे सगळं मी संजयसाठी नव्हे तर तुझ्यासाठी करतोय." जेव्हा संजय दत्त जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता, तेव्हा तो वडिलांसोबत मातोश्रीवर गेला होता आणि त्याने बाळासाहेबांचे आभार मानले होते. या भेटीवेळी संजय दत्तचे डोळे पाणावले होते.  

 

बातम्या आणखी आहेत...