आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Here Is The Reason Why Nana Patekar Wont Work With Sanjay Dutt

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26 वर्षांपासून संजय दत्तवर नाराज आहेत नाना पाटेकर, एकत्र काम न करण्याची घेतली होती शपथ, आजही आपल्या निर्णयावर आहेत ठाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाची 68 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 जानेवारी 1941 रोजी मुरुड, जंजीरा येथे जन्मलेल्या नानांनी बॉलिवूडमध्ये अनिल कपूर, जॉन अब्राहम, अमिताभ बच्चन , सलमान खान आणि शाहरुख खानसह अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. पण ते कधीही स्क्रिनवर संजय दत्तसोबत झळकले नाहीत. यामागचे कारण म्हणजे 26 वर्षांपूर्वी नानांनी घेतलेली एक शपथ आहे. 12 मार्च 1993 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर नानांनी संजय दत्तसोबत कधीही काम न करण्याची शपथ घेतली होती. 


नाना म्हणाले होते - मी कधीही संजय दत्तसोबत काम करणार नाही....
- नानांनी एका मुलाखतीत म्हटले होते,  "मी माझ्या करिअरमध्ये कधीही संजय दत्तसोबत काम केले नाही आणि भविष्यातही करणार नाही. 1993 साली जे झाले, ते आठवले तरी अंगावर शहारा येतो. या बॉम्बस्फोटासाठी संजय दत्त जबाबदार आहे, असे मी म्हणत नाही. पण तरीदेखील मला त्याच्यासोबत काम करायचे नाही. माझ्या भावाचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला म्हणूनही मी असे करत नाहीय. हे पाऊल मी त्यांच्यासाठी उचलले जे या स्फोटात मारले गेले. ही माझ्याकडून संजय दत्तला शिक्षा आहे." नानांनी दोन चित्रपट असे केले, ज्याच्याशी संजय दत्तचे नाव जोडले गेले होते. त्यापैकी एक म्हणजे 'दस कहानियां' (2007) आणि दुसरा आहे 'टॅक्सी नं. 9211' (2006). पण दोघे स्क्रिनवर एकत्र दिसले नाहीत.


काय घडले होते 1993 मध्ये...
- मार्च 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात नाना पाटेकरांनी त्यांच्या भावाला गमावले होते. हा स्फोट वरळीतील एका बसमध्ये झाला होता, त्यात त्यांचा भाऊ प्रवास करत होता. नशीबाने या स्फोटातून नानांची पत्नी थोडक्यात बचावली होती. एकामागून एक झालेल्या 12 स्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटात संजय दत्तचे नाव समोर आले होते. त्याच्यावर बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याचा आरोप होता. त्यानंतर नानांनी कधीही संजय दत्तसोबत काम करणार नसल्याचा निर्णय घेतला होता.