आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : रेसलिंग रिंगमध्ये जखमी झाल्यानंतर राखी सावंतचा पहिला व्हिडिओ आला समोर, म्हणतेय - मी तिला अमेरिकेत जाऊन मारणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. नुकतीच राखीने हरियाणातील झालेल्या रेसलिंग स्पर्धेत हजेरी लावली होती. मात्र या खेळात राखीला दुखापत झाली असून तिला थेट रुग्णालय गाठावे लागल्याचे समोर आले. हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रेसलिंगच्या बिग फाईटचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राखीने विजयी महिला कुस्तीपटूला आव्हान करत तिच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. मात्र राखीला हे आव्हान चांगलेच महागात पडले असून विदेशी महिला कुस्तीपटूने राखीला धोबीपछाड केले.


जमिनीवर जोरात आपटल्यामुळे राखीच्या पाठीत आणि पोटात असह्य वेदना होऊ लागल्या त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर आता राखी पंचकुलास्थित एका हॉटेलमध्ये विश्रांती घेत आहे. राखीचा येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ती म्हणतेय की, मी तिला चॅलेंज दिले नव्हते. माझ्यासोबत धोका झाला आहे. कारण मी तिथे फक्त डान्स करायला गेले होते. मी आता अमेरिकेत जाऊन तिला मारणार आहे. तनुश्रीलाही मी मारणार आहे, असे राखी या व्हिडिओत म्हणतेय.

 

नेमके काय घडले होते? 

पंचकुला येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत विदेशी कुस्तीपटू रैवलने फाईट जिंकल्यानंतर ‘कुण्या भारतीय महिलेत हिंमत असेल तर तिने माझ्याशी लढावे’, असे ओपन चॅलेंज दिले होते. तिचे हे चॅलेंज ऐकताच राखीने तिला प्रतिआव्हान देत ‘तुझ्यात दम असेल तर तू माझ्यासारखे नाचून दाखव’ असे सांगितले. त्यानंतर राखीने डान्स करण्यास सुरुवात केली. मात्र तिचा डान्स पाहत असताना अनेकांनी राखीला चीअरअप करत रैवलनला ठेंगा दाखवत चिडवले. हा राग मनात धरत रैवलनने राखीला हवेत उचलून जोरात जमिनीवर आपटले होते.
 

 

बातम्या आणखी आहेत...