आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 5 महिन्यांनी आला पहिला करवाचौथ, पण सोनमने नव-यासाठी ठेवले नाही व्रत, आता सांगितले यामागचे खरे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शनिवारी सर्वत्र करवाचौथ साजरा झाला. यानिमित्ताने सामान्यांप्रमाणेच बॉलिवूडच्या विवाहित अभिनेत्रींनी त्यांच्या पतीसाठी व्रत ठेवले होते. पण सोनम कपूरने मात्र लग्नानंतरच्या पहिल्या करवाचौथला उपवास केला नव्हता. यामागचे कारणही सोनमने सोशल मीडियावर सांगितले आहे. सोनमने तिचा नवरा आनंद आहुजासोबतचा एक फोटो शेअर करुन तिला व्रत न ठेऊ दिल्याबद्दल त्याला धन्यवाद म्हटले आहे. 


सोनमने काय लिहिले.... 

- सोनमने फोटोसोबत लिहिले, "मला आशा आहे की, मी तुझ्यासोबत एक अतिशय आनंदी आयुष्य जगेल. मला ठाऊक आहे की, तू  मोस्ट प्रोगेसिव, कॉम्पेशिनेट आणि जेंटलमैन  आहेस. करवाचौथच्या शुभेच्छा आणि धन्यवाद, मला हा करवाचौथ अनोख्या पद्धतीने साजरा करु दिल्याबद्दल..."  दिल्ली बेस्ड बिझनेसमन आनंद आहूजासोबत याचवर्षी मे महिन्यात सोनम विवाहबद्ध झाली. पंजाबी पद्धतीने झालेल्या या लग्नाला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती.

 

सोशल मीडिया यूजर उडवत आहेत आनंदची खिल्ली... 
- सोनमने जो फोटो शेअर केला आहे, तो बघून सोशल मीडिया यूजर्स तिच्या नव-याची खिल्ली उडवत आहेत. अनेक यूजर्स आनंदला म्हातारा म्हणत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, "मैं क्या करूं राम मुझे बुड्ढा मिल गया." आणखी का यूजरने लिहिले, "आनंद सोनमपेक्षा वयाने बराच मोठा असावा, असे मला वाटत आहे." एका यूजरने तर आनंद तुझे वडील आहेत का? असा प्रश्नच सोनमला विचारला आहे.  

बातम्या आणखी आहेत...