आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Here Mysterious Pit Has Been Burning Continuously For 47 Years, The Door To Hell

रहस्यमयी खड्डयांमधून 47 वर्षांपासून निघतेय भयंकर आग, लोक म्हणतात 'नर्काचे व्दार'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात अनेक विचित्र घटना घडत असतात. या एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नसतात. अशीच एक घटना 47 वर्षांपुर्वी तुर्कमेनिस्तानच्या काराकुम वाळवंटात घडली. ही घटना अजूनही लोकांसाठी रहस्य बनली आहे. येथून एका रहस्यमयी खडड्यातून 47 वर्षांपासून सतत आग निघतेय. अनेक लोक याला नर्काचे व्दार असेही म्हणतात. 

 

70 च्या दशकात सोवियत यूनियन जगातील सर्वात शक्तिशाली देश होता. 1971 मध्ये येथील एक वैज्ञानिकांचे दल नैसर्गिक गॅसच्या शोधात तुर्कमेनिस्तानच्या काराकुम वाळवंटात पोहोचले आणि तिथे एक खड्डा खोदण्यात आला. खड्ड्याच्या आजुबाजूला मोठ-मोठ्या मशीन लावण्यात आल्या आणि जमीनीमध्ये खोदकाम करणे सुरु झाले, पण एक दिवस अचाकन जमीनीचा मोठा भाग खाली ठासळला आणि यामुळे एक मोठा खड्डा पडला. 


जमीन ठासळल्यानंतर एक मोठा खड्डा निर्माण झाला. हा खड्डा 130 फूट रुंद आणि 60 फूट खोल होता. या खडड्यामधून सतत मिथेन गॅस निघत होता. यानंतर वैज्ञानिकांना वाटले की, हा गॅस जाळून टाकला तर काही दिवसांनंतर हा गॅस संपून जाईल आणि आग विझून जाईल. पण असे झाली नाही. ही आज आजही विझलेली नाही आणि सतत पेटलेली आहे.

 

या रहस्यमयी खड्डयांमध्ये अशी भयानक आग निघते की, लोक पाहून घाबरतात. वैज्ञानिकांचीही या खडड्यामध्ये जाण्याची हिंमत होत नाही. कारण आजुबाजूच्या गावांमध्ये राहणारे लोक याला नरकाचा दरवाजा म्हणतात. ते मानतात की, नरकामध्येही अशीच आग असते.

 

बातम्या आणखी आहेत...