आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-शाहरुख नव्हे तर हे सेलिब्रिटी राहणार प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या पार्टीला हजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः आज (18 ऑगस्ट) रात्री मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत साखरपुडा करणार आहे. तसं पाहता या दोघांनी प्रियांकाच्या वाढदिवस म्हणजे 18 जुलै रोजी लंडनमध्ये साखरपुडा केला होता. पण आता प्रियांका मुंबईत पारंपरिक पद्धतीने विधीवत साखरपुडा करतेय. तत्पूर्वी शनिवारी सकाळी तिच्या राहत्या घरी रोका सेरेमनी पार पडली. पार्टीचे आमंत्रण प्रियांकाचे नातेवाईक, जवळचे मित्र आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना पाठवण्यात आले आहे. या पार्टीत अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान गैरहजर राहणार असल्याचे समजते.


हे सेलिब्रिटी राहणार 
- प्रियांका-निकची एंगेज्मेंट पार्टी शनिवारी रात्री आयोजित करण्यात आली आहे. या पार्टीत रणवीर सिंह, कंगना रनोट, आलिया भट, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, अनुराग कश्यप, संजय लीला भन्साळींसह अनेक सेलेब्स सहभागी होणार आहेत.


- याशिवाय प्रियंका सध्या शुटींग करत असलेल्या सोनाली बोस यांच्या ‘स्काय इज पिंक’ची संपूर्ण टीमसह फरहान अख्तर आणि झायरा वसीम यांना तिने खास आमंत्रित करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसंच या सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला आणि निर्माते सिध्दार्थ रॉय कपूरसुध्दा या डिनर पार्टीला उपस्थित राहणार असल्याचे समजते.

 

सलमान-शाहरुखसह हे सेलेब्स राहणार पार्टीत गैरहजर...
- सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी माल्टा येथे आहे. यामुळे तो प्रियांकाच्या पार्टीत सहभागी होऊ शकणार नाही. प्रियांकाने सुरुवातीला हा चित्रपट साइन केला होता. पण ऐनवेळी तिने यातून काढता पाय घेतला. यामुळे सलमान तिच्यावर सध्या नाराज आहे.

- शाहरुख खान प्रियांकाच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. पण तोदेखील या पार्टीत सहभागी होऊ शकणार नाही. कारण तो सध्या त्याच्या आगामी 'जीरो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे, तर त्याचे कुटुंबीय सध्या कॅलिफोर्नियात आहे. त्यामुळे खान कुटुंबातून कुणीही या पार्टीत सहभागी होणार नाही.

- रणबीर कपूर सध्या बुल्गारियामध्ये त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्यामुळे त्याचे पार्टीत सहभागी होणे अशक्य आहे. दोघांनी 'अनजाना-अनजानी' या चित्रपटात एकत्र काम केले होते. 

- अनुष्का प्रियांकाची जवळची मैत्रीण आहे. पण तीसुद्धा या पार्टीत सहभागी होऊ शकणार नाहीये. कारण सध्या ती लंडनमध्ये आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...