Home | Business | Auto | Hero Motocorp discount offers for voters

हीरो मोटोकॉर्प ऑफर : मतदान करणाऱ्या ग्राहकांना मोफत देणार ही सर्व्हिस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 01:28 PM IST

मतदानाच्या दोन दिवसांपर्यंत या ऑफरचा फायदा घेता येईल

 • Hero Motocorp discount offers for voters

  नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठी टु-व्‍हीलर निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्पने कस्टमर बेनिफिट योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत कंपनी लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांना हीरोच्या मोटरसाइकिल आणि स्कुटरचा मेन्टेनंस आणि सर्व्हिस चार्जमध्ये सुट देणार आहे. यामुळे देशातील 8 कोटी ग्राहकांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.


  अशाप्रकारे मिळणार फायदे

  मतदान केल्यानंतर ग्राहक आपली गाडी घेऊन हीरो मोटोकॉर्प डीलरशिप आणि वर्कशॉप्‍सवर जा आणि आपल्या बोटावरील वोटर शाई दाखवून फ्री टु-व्‍हीलर वॉशचा लाभ घ्या. यासोबतच फक्त 199 रूपयांत आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करू शकता. ही योजना एप्रिल-मे 2019 पर्यंत प्रत्येक शहरात मतदानाच्या तारखेनंतर दोन दिवसांपर्यंत उपलब्‍ध असणार आहे.


  जवळील हीरो डीलरशिपकडून मिळवा माहिती

  ग्राहक व्हीकल-सर्व्हिसिंग पॅकेजचे प्री-बुक करू शकता. या योजनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या शहरातील जवळील हीरो मोटोकॉर्प डीलरशिपला भेट देऊ शकता.

Trending