आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Activa आणि Access सारख्या स्कूटर्सला टक्कर देणार ही दमदार मोपेड, 60 KMPL मायलेज आणि किंमत फक्त...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - हिरो मोटोकॉर्पने आपले न्यू डेस्टिनी 125 स्कूटरची विक्री देशभरात सुरू केली आहे. अर्थात आता मुंबईसह, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, कोलकातासह विविध शहरांमध्ये हे स्कूटर ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर डॉक्टर मार्कस ब्रन्सपेर्जर यांनी लाँचिंग इव्हेंटमध्ये सांगितले, Destini 125 स्कूटरमध्ये i3S टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. मार्केटमध्ये उपलब्ध भल्या-भल्या स्कूटर्सला टक्कर देणाऱ्या Destini 125 ची किंमत फक्त 54,650 पासून सुरू होत आहे.


i3S टेक्नोलॉजी
हिरो प्रथमच एका स्कूटरमध्ये i3S टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. हे कंपनीचे आयडिअल स्टार्ट आणि स्टॉप सिस्टिम आहे. यातून स्कूटरला चांगले मायलेज देण्यात आणि प्रामुख्याने सिग्नलवर पेट्रोल वाचवण्यात मदत होते. या स्कूटरचे मायलेज 55 ते 60 kmpl आहे. 


Destini 125 स्कूटरचे फीचर्स
> यात 125cc चे सिंगल सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 8.7PS आणि 10.2Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते.
> यात ऑप्शनल फ्रंट डिस्क ब्रेकसह इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (IBS) सिस्टिम देण्यात आली आहे. 
> साइड स्टॅन्ड इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर, पास स्विच आणि एक्सटर्नल फ्यूल फिलिंग सुद्धा आहे.
> डेस्टिनीच्या VX मॉडेलमध्ये बूट लाइट, मोबाइल चार्जिंग पॉइंट मिळतील. 
> क्रोम फिनिश, कास्ट व्हील आणि डुअल टोन सीट कवर देण्यात आले आहे. 


हिरोने डेस्टिनी 125 पूर्णपणे भारतातच डिझाईन करण्यात आले आहे. याची निर्मिती जयपूरच्या हिरो मोटोकॉर्पच्या आर अॅन्ड डी सेंटरमध्ये झाली आहे. हे स्कूटर Honda Activa, Activa 125, होंडा ग्राझिया, सुझुकी अॅक्सेस 125 आणि टीव्हीएस एनटॉर्कसारख्या स्कूटर्सला जबरदस्त टक्कर देणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...