आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरो मोटोकॉर्पच्या मोटारसायकल 1 जानेवारीपासून 2000 रुपयांनी महागणार, प्रत्येक मॉडेलच्या किमती वेगळ्या असतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हीरो मोटोकॉर्प वर्षाला 90 लाख गाड्या विकते

मुंबई- टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्प पुढील महिन्यांपासून मोटारसायकलच्या किमती वाढवणार आहे. कंपनीच्या मोटरसायक आणि स्कूटर एक जानेवारीपासून 2000 रुपयांपर्यंत महाग होणार आहेत. हीरो मोटोकॉर्पने सोमवारी ही माहिती दिली. दरम्यान, कोणत्या मॉडेलच्या किती किमती वाढणार याची माहिती कंपनीने दिली नाहीये. तसेच, कोणत्या कारणामुळे किमती वाढवल्या जात आहेत, हेदेखील सांगितले नाहीये.

हीरोची स्प्लेंडर सर्वात जास्त विक्री असणारी गाडी
 
हीरो मोटोकॉर्प 39,900 रुपयांपासून 1.05 लाख रुपयापर्यंतच्या मोटरसायक आणि स्कूटर विकतात. 2018-19 च्या वार्षिक रिपोर्टनुसार हीरो मोटोकॉर्प वर्षात 90 लाख टू-व्हीहर बनवते. कंपनीची स्प्लेंडर बाइक सर्वात जास्त विक्री असलेली मोटारसायकल आहे. तर ग्लॅमर, पॅशन, इग्नाइटर, एक्सट्रीम200 आणि हंकला तरुणांची चांगली पसंती आहे. 2018-19 मध्ये कंपनीने 78.21 लाख मोटारसायकल विकल्या.