आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
फ्लोरिडा - अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी एक विचित्र घटना समोर आली होती. यात एका महिलेने पोलिसांत कार चोरीची तक्रार दाखल केली होती. यानंतर अॅक्शन घेत पोलिसांनी काही तासांतच ती शोधून काढली. भरउन्हात कार उभी असल्याने प्रचंड गरम झालेली होती. ही कार शोधणारे पोलिस अधिकारी कारचा दरवाजा उघडताच प्रचंड हादरले. कारमध्ये 3 वर्षांची एक चिमुरडी बंद होती. ती त्याच महिलेची मुलगी होती, जिने कार चोरीची तक्रार दाखल केली होती. यानंतर अधिकाऱ्याने ताबडतोब त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले. नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. महिलेविरुद्ध निष्काळजीपणाची तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रचंड उकाड्यात बेशुद्ध पडली होती चिमुरडी
- ही घटना 17 जूनची आहे. जेव्हा फ्लोरिडाच्या सेमिनोल काउंटीमध्ये काम करणाऱ्या डेप्युटी बिल डुन यांना एक कार चोरीची तक्रार मिळाली होती. यांनतर काही तासांतच ऑफिसरने ती कार शोधून काढली, जी तप्त उन्हात उभी होती. भयंकर तापलेली कारचा अधिकाऱ्याने दरवाजा उघडला असता त्यांना मध्ये एक चिमुरडी दिसली. उकाड्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. त्या वेळी कारच्या आतील तापमान जवळजवळ 44 ते 45 डिग्री सेल्सियस होते.
- अधिकाऱ्याला वाटले की, गरमीमुळे मुलीचा मृत्यू झालेला आहे. परंतु दार उघडून अधिकाऱ्याने मुलीची नाडी पाहिली असता ती जिवंत आढळली. यानंतर त्यांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले. पूर्ण वाटेत ते चिमुरडीशी बोलत होते, जेणेकरून ती बेशुद्ध होऊ नये. ते मुलीला म्हणाले, 'इट्स ओके, बेबी. माझ्या बोल. तू ठीक आहेस.'
- ऑफिसरने नंतर सांगितले, 'जेव्हा मी कारचे दार उघडले तेव्हा आत जवळजवळ 44-45 डिग्री सेल्सियस तापमान होते. मी पाहिले तर मला वाटले की, कदाचित ती जिवंत असावी, मग तिची पल्स चेक केल्यावर ती सुरू होती. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. मग जेव्हा माझ्या कारमध्ये तिला थंड हवा लागली, तेव्हा तिच्या शरीराची आणि डोळ्यांची थोडीबहूत हालचाल झाली.'
- हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला 3 तास इमर्जन्सी रूममध्ये ठेवण्यात आले, तेव्हाही तो ऑफिसर रडत होता आणि ती ठीक होण्याची वाट पाहत होता. 3 दिवसांनंतर जेव्हा मुलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा तेव्हा ते पुन्हा एकदा तिला भेटण्यासाठी गेले.
आईविरुद्ध गुन्हा दाखल
- तपासादरम्यान पोलिसांना कळले की, 3 वर्षांची ही चिमुरडी त्याच के. सी. डिलन केलरची होती, जिने कार चोरीची तक्रार दाखल केली होती.
- पोलिसांच्या मते, मुलीची आई दारूच्या दुकानावर गेली होती, तेथे दारू प्यायल्यानंतर नशेत तर्रर होऊन ती मुलीला कारमध्येच विसरून गेली होती. नंतर पोलिसांत जाऊन फक्त कार चोरीची तक्रार तिने दाखल केली.
- विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावरही महिलेला मुलगी आठवली नाही. यामुळे तिने फक्त कार चोरीचीच तक्रार दाखल केली होती. मग कारचा शोध घेताना पोलिसांनी चिमुरडी आढळली.
- या घटनेनंतर आरोपी आईविरुद्ध मुलीची हेळसांड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचा व्हिडिओ व फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.