आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न बजाज न होंडा...भारतात ही बाइक सर्वात जास्त खरेदी करतात लोक, किंमतही एवढी कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ऑटोकार वेबसाइटने सप्टेंबर 2018 मध्ये सर्वात जास्त विकल्या गेलेल्या बाइकची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. ही लिस्ट मोटरसायकल रजिस्टर्ड रेकॉर्ड YoY (ईयर ओव्हर ईयर) च्या ग्रोथ आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये हिरोच्या तीन गाड्या टॉप-3 पोझिशनवर आहेत. या व्यतिरिक्त हीरो स्प्लेंडर पहिल्या क्रमांकावर आहे.


सप्टेंबरमध्ये 2.88 लाख युनिट सेल
मागील महिन्यात कोणताही मोठा सण किंवा उत्सव नव्हता, तरीही हिरो स्प्लेंडरच्या एकूण 285,508 गाड्यांची विक्री झाली. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 248,293 स्प्लेंडरची विक्री झाली होती. म्हणजेल कंपनीने या वर्षी 37,215 स्प्लेंडरची जास्त विक्री केली आहे. स्प्लेंडरच्या तुलनेत बजाजची सर्वात जास्त विक्री झालेली CT100 च्या केवळ 89,387 गाड्या सेल झाल्या. म्हणजेच दोन्ही गाड्यांमध्ये 196,121 यूनिटचे अंतर आहे.

 

टॉप-10 बाइक सेलिंग लिस्ट

रॅॅंंक  कंपनी आणि माॅॅडेेेल यूनिट सेल
1 Hero Splendor 285,508
2 Hero HF Deluxe 201,240
3 Hero Passion 95,057
4 Bajaj CT 89,387
5 Bajaj Pulsar 89,374
6 Hero Glamour 82,864
7 Honda CB Shine 80,612
8 Bajaj Platina 67,450
9 TVS Apache 55,460
10 RE Classic 350 44,021

 

हिरो स्प्लेंडरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
स्प्लेंडरचे नवीन मॉडेल स्प्लेंडर प्लस नावाने मार्केटमध्ये लॉन्च झाले आहे. यामध्ये 100cc इंजिन आहे. यासोबतच 4-स्पीड गेअर बॉक्स आहे. बाइकची मॅग्झिमम स्पीड 87 Kmph आणि मायलेज 75kmpl आहे. ही गाडी किक आणि सेल्फ स्टार्ट दोन्ही मॉडेलमध्ये येते.


- बाइकला समोर टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉकप आणि पाठीमागे स्विंग आर्म हायड्रॉलिक शॉकप देण्यात आले आहे. मागे आणि पुढे डिस्क ब्रेक आहेत.


- 11 लिटर फ्युल कपॅसिटी आहे. 1 लिटरचे रिझर्व्ह आहे. बाइकचे एकूण वजन 112 किलोग्राम आहे. 130 किलो लोड घेऊ शकते.


हिरो स्प्लेंडर किंमत
> किक स्टार्ट ड्रम ब्रेक स्पॉक व्हील : 49,060 रुपये
> किक स्टार्ट ड्रम ब्रेक अलॉय व्हील : 50,060 रुपये
> सेल्फ स्टार्ट ड्रम ब्रेक अलॉय व्हील : 52,060 रुपये

बातम्या आणखी आहेत...