आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमधून आलेल्या मालगाडीतून पावणेपाच काेटींचे हेराॅइन जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अटारी  - पाकिस्तानातून आलेल्या एका मालगाडीच्या डब्यामध्ून सीमाशुल्क विभागाने जवळपास ९४५ ग्रॅम हेराॅइन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ४ काेटी ७२ लाख रुपये आहे. पाकिस्तानातून ७ जुलै राेजी आलेल्या मालगाडीची तपासणी करताना डब्याच्या वरच्या भागातील काेपऱ्यात लपवून ठेवलेली चार पाकिटे जप्त करण्यात आली. यामध्ये ९४५ ग्रॅम हेराॅइन हाेते. सीमाशुल्क अधिनियम १९६२ अन्वये हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ७२ लाख रुपये आहे. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत असल्याचे सीमाशुल्क आयुक्त दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले. दरम्यान, पाकमधून येणाऱ्या रेल्वेगाड्यांतून यापूर्वीही अनेकदा अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच संबंधित तस्करांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समाेर आले हाेते. त्यामुळे सीमाशुल्क विभागाने अनेकांवर कारवाई केलीय.   

बातम्या आणखी आहेत...