आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच मोबाइलवर ३ व्हाॅट्सअॅपद्वारे महिलांना ब्लॅकमेल करणारा हायटेक लखोबा जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १५ ते २० महिलांना ब्लॅकमेल करत असल्याचे तपासात स्पष्ट

नाशिक- व्हाॅट्स अॅपमध्ये नवनवीन फीचर्स जेवढे चांगले तितकेच वाईट देखील अाहेत. सुविधांचा फायदा होण्यापेक्षा गैरप्रकारच अधिक घडत अाहे. अशाचप्रकारे एका हॅकरने मोबाइलवर तीन व्हाॅट्स अॅप नंबरच्या आधारे १५ ते २० महिलांना त्यांचे प्रेमप्रकरण असल्याचे सांगत ब्लॅकमेल करत अश्लील मेजस पाठवले. पीडित युवतीने याबाबत सायबर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढत काही तासांत त्याला जेरबंद केले. युवराज बाजीराव डुंबरे (रा. मुसळगाव, सिन्नर) असे या संशयिताचे नाव अाहे.पोलिसांनी दिलेली माहिती व पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताचे सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला व युवतींचे नंबर मिळवत महिलांना तीन नंबरद्वारे मेसेज करत मैत्री करत होता. एका नंबरवरून मेसेज करत महिला व युवतींना तुमचे प्रेमप्रकरण मला माहिती अाहे, प्रियकरासोबतचे फोटो घरच्यांना दाखवण्याची धमकी देत हॉटेलमध्ये भेटण्यास बोलवता होता. भेटण्यास अाली तर सर्व फोटो तुझ्या समोर डिलिट करण्याचे सांगत तो महिला व युवतींना ब्लॅकमेल करत असे. पीडित युवतींनी नंबर ब्लॉक केला तर दुसऱ्या नंबरवरून त्यांच्यावर लक्ष ठेवत व्हाॅट्सअपद्वारे पाठलाग करुन त्यांना ब्लॅकमेल करत होता. पीडितेचे अशा प्रकारे कुठलेही प्रेमप्रकरण नसल्याने तिने सायबर पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ संशयिताचा माग काढत पथकाने त्याला सापळा रचून अटक केली.

सापळा रचून केली अटक
 
संशयिताला पीडितेच्या मोबाइलद्वारे मेसेज पाठवत हाॅटेलमध्ये भेटण्यास बोलावले. युवती भेटणार असल्याने त्याने होकार दिला. एका हॉटेलमध्ये संशयित येताच पथकाने त्याला अटक केली.

महिलांनी संपर्क साधावा


संशयिताने अशा प्रकारे कुणास ब्लॅकमेल केले असल्यास पिडीत महिला व युवतींनी संपर्क साधावा. संशयितावर कडक कारवाई करण्यात येईल. अनोळखी नंबरला रिप्ले देऊ नका सतर्क व्हा. -देवराज बोरसे, वरिष्ठ निरिक्षक सायबर पोलिस ठाणे