आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुण प्राध्यापिकेवर जिवंत जाळण्याच्या संतापजनक घटनेनंतर हिंगणघाट येथे आज सर्वपक्षीय निषेध मोर्चा; बंदची हाक

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
घटनेनंतर हिंगणघाट पोलिस ठाण्यासमोर गोळा झालेला संतप्त जमाव. - Divya Marathi
घटनेनंतर हिंगणघाट पोलिस ठाण्यासमोर गोळा झालेला संतप्त जमाव.

वर्धा - तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या संतापजनक घटनेनंतर हिंगणघाट तालुक्यामध्ये मंगळवारी बंद पाळण्यात येणार आहे. तसेच  सकाळी ७ वाजता सर्वपक्षीय  मोर्चा काढण्यात येणार असून बाजारपेठेसोबतच शाळा-महाविद्यालये बंदची हाक देण्यात आली आहे.   वर्धा येथेही विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 

हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी (रेल्वे)  येथील बाजारपेठ बंद राहणार आहेत. पीडित तरुणीवर न्याय मिळावा तसेच गुन्हेगारास कठोर शिक्षा द्यावी. यासाठी संपूर्ण हिंगणघाट तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी दि.४ रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक  येथून   सकाळी ७ वाजताच्या सुमारास मोर्चाची सुरुवात होणार असून नागरिक तसेच  शाळा व महाविद्यालयांनाही बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आल्याचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी सांगितले. 

वर्धा येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार :  हिंगणघाट प्रकरणी  नराधमाला तात्काळ शिक्षा व्हावी,  या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालावा, दोन महिन्यांच्या आत या आरोपीला शिक्षा व्हावी, त्याला जामीन देऊ नये तसेच महिला सुरक्षेच्या प्रश्नावर वर्धा येथे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.   यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, तसेच समविचारी संघटनांना दि.४  रोजी सकाळी ११:३० वाजता वर्धेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येणार असून त्यानंतर मोर्चाद्वारे निवेदन देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...