आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हिडिओ व्हायरल करण्याऐवजी मदत करायला हवी होती, मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी सुनावले

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक, ७२ तास आव्हानात्मक
  • मुलींना सातच्या आत घरात यायला सांगतात. मग मुलांना दहाच्या आत घरी येण्यास का सांगत नाहीत, विद्यार्थिनी

हिंगणघाट - माणूसकीच्या गोष्टींना काही अर्थ नाही सर. आजकाल कोणतीही गोष्ट घडत असताना लोकांना मदत करण्याऐवजी वा वाचविण्याऐवजी पहिल्यांदा घटनेचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची घाई झालेली असते. आमच्या मॅडम त्यामुळेच जळाल्या, असे सांगताना व्हिडिओ काढून व्हायरल करण्याऐवजी लोकांनी मदत करायला पाहिजे, असे खडे बोल हिंगणघाट येथील मातोश्री महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी सुनावले. “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने या विद्यार्थीनींशी संवाद साधला असता त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ऋचिता देहारकर, पल्लवी चौधरी, श्रृती मांडवे, श्रुती बुरड, पायल लाजूरकर, वैष्णवी चंदनखेडे या मुलींनी मोबाईलवर व्हिडिओ काढण्याच्या प्रवृत्तीवर तीव्र आक्षेप घेतला. मुलींना सातच्या आत घरात यायला सांगतात. मग मुलांना दहाच्या आत घरी येण्यास का सांगत नाहीत, असा सवाल ऋचिता देहारकर हीने केला. मुले चौकात राहून हुल्लडबाजी करतात. त्यांना कोणी हटकत  नाही. पण, मुलींना पदोपदी दाेष देतात, हे थांबले पाहिजे, असे ती म्हणाली. 
पल्लवी चौधरीने विकेशलाही पेट्रोल टाकून जाळले पाहिजे. तेव्हाच त्याला जळण्यामुळे होणाऱ्या वेदना कळतील, अशी तीव्र भावना व्यक्त केली. वैष्णवी मडावीने पोलिस काहीच करीत नाहीत, असा सूर लावला. तर श्रुती मडावी हीने मॅडमबद्दल झाले ते वाईटच झाले. असे व्हायला नको होते असे सांगतानाच प्रत्येक प्रकरणात मुलांची चूक असते असे नाही, असा वेगळा सूर या वेळी विद्यार्थीनींनी लावला.