आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयाेध्येत हाय अलर्ट, पीएसीच्या 47 कंपन्या तैनात, 200 आणखी मागवल्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या : सुप्रिम काेर्टाचा संभाव्य निर्णय व त्या आधीची दिवाळी या पार्श्वभूमीवर अयाेध्येमध्ये सुरक्षेसाठी कडक बंदाेबस्त ठेवला आहे. वास्तविक येथे नेहमीच उच्च सुरक्षा असते, परंतु यावेळी परिस्थिती जास्त गंभीर झाली आहे. ते लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र तिवारी, डीजीपी अाे. पी. सिंह तसेच माेठे अधिकारी दाैरा करत आहेत. त्याचबराेबर संत-महंतांबराेबर तयारीच्या दृष्टीने सातत्याने बैठकी घेतल्या जात आहेत.

सुरक्षेसाठी अयाेध्येचे लाल, पिवळा, निळा तीन भागांत विभाजन केले आहे. लाल भागात वादग्रस्त जागेची सुरक्षा आहे. येथे सुरक्षा दल अत्याधुनिक शस्त्र, वाॅच टाॅवर, ड्राेन कॅमेरा, सीसीटीव्हीने सज्ज आहे. लाल विभागाची सीमा राम जन्मभूमीच्या एक कि.मी. परीघात ठेवली आहे. पिवळ्या भागात पूर्ण अयाेध्या नगरी सीमाकक्षात ठेवण्यात आली आहे. बाहेरील भाग निळ्या विभागात आहे. २४ तास येथे सुरक्षा तैनात असते.अयाेध्येत येणारे सर्व रस्ते, घाट, शरयू नदीच्या किनाऱ्याची देखरेख करण्यासाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त केले आहेत. कॅमेऱ्यांची संख्या शेकडाेमध्ये असून त्याचे कंट्राेल कमांड सेंटर नया घाट पाेलिस चाैकीवर तयार केले आहे. अयाेध्येत सर्व प्रवेशद्वारांवर बारकाेडिंग केले आहे. येथे एक निरिक्षक, एक उपनिरिक्षक यांच्यासह ६ पाेलिस तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी पीएसीच्या ४७ कंपन्या मागवण्यात आल्या आहेत. येणाऱ्या दिवसात २०० कंपनी पीएसी व अर्धसैनिक बल तैनात केले जाईल. डीएम अनुज कुमार झा यांच्या मते, दिवाळी. सुप्रिम काेर्टाची सुनावणी व निर्णयाशी निगडीत सुरक्षा व्यवस्थेवर आमचे पूर्ण लक्ष आहे. अयाेध्येतल्या तात्पुरत्या राम मंदिर सुरक्षेचा आढावा उच्चस्तरीय समिती घेत आहे.

सार्वजनिक ठिकाणी टीव्ही चर्चांवर बंदी, कारसेवकपुरम शांत
१९८९, १९९१ व २००१ च्या शिलान्यासाच्या वेळी रामभक्तांचे प्रमुख ठिकाण कारसेवकपुरम सध्या शांत आहे. येथे विहिंपचा माेठा अधिकारी नाही. कलम १४४ लागू झाल्याने प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी टीव्ही चर्चेला बंदी घातली आहे. मंगळवारी अयाेध्येत दीपाेत्सवाच्या निमित्ताने अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी संतही आले.
भास्करने दाेन्ही पक्षांच्या मनातील गाेष्ट जाणली

एक वर्षात मंदिर बनेल
मंदिराच्या उभारणीसाठी दगड तासून तयार आहेत. एका वर्षात मंदिर बनेल, उर्वरित जागेवर रुग्णालय, वाचनालय हाेईल. मंदिरात सर्वधर्मीय दर्शन घेऊ शकतील - नृत्य गाेपल दास, अध्यक्ष, रामजन्मभूमी न्यास.

फक्त सुख-शांती नांदावी
अयाेध्येच्या मुस्लिमांना त्रास नाही. वातावरण शांत राहील. जेव्हा राजकारण हाेते तेव्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावली जातात
- इक्बाल अन्सारी, वकील, बाबरी मस्जिद.

कोर्ट तथ्यांवर निर्णय करेल
सुप्रिम काेर्ट तथ्यावर राम मंदिराच्या बाजूने निर्णय देईल. मंदिर निर्मितीसाठी ६५ टक्के दगड काेरून झाले आहेत.प्रथम तळ मजला बनवला जाईल. दुसऱ्या मजल्यासाठी खडक कोरले जात आहेत.
- शरद शर्मा, मीडिया प्रभारी, विहिंप.

आम्हाला निर्णयाची प्रतीक्षा आहे
सर्वात माेठे न्यायालय काय निर्णय देते हे बघायचे आहे. निर्णय एकाच पक्षाच्या बाजूने असेल हे निश्चित आहे. सद्भावना कायम राहील ही आमची जबाबदारी आहे.
- हाजी महबूब, मस्जिदीचे वकील

बातम्या आणखी आहेत...