आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त कॅलरीच्या फूडमुळे होते शरीराचे नुकसान, वाचा का टाळावे हे 7 पदार्थ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेल्थ सर्व्हिस, यूकेने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार सामान्यतः पुरुषांना एका दिवसात 2500 कॅलरी आणि महिलांना दिवसातून 2000 कॅलरीची गरज असते. अधिक प्रमाणात कॅलरी असणारे अनेक पदार्थ आपल्या आहारामध्ये असतात. या पदार्थांचे गरजेपेक्षा जास्त सेवन केले तर लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणामुळे इतर अनेक आरोग्य समस्यांची शक्यता असते. यासाठी अपोलो हॉस्पिटलच्या चीफ आहारतज्ज्ञ डॉ. विधी विजयवर्गीय जास्त कॅलरीचे पदार्थ मर्यादित खाण्याचा सल्ला देतात. त्या आज अशाच 7 पदार्थांविषयी सविस्तर माहिती सांगणार आहेत. 


जाणून घ्या जास्त कॅलरीच्या पदार्थांविषयी...का टाळावे हे 7 पदार्थ?  
लस्सी -१ ग्लासात २३० कॅलरी असतात. रोज लस्सी पिल्याने वजन वाढते. यामुळे कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढते. 


अधिक चरबीयुक्त दूध -१ ग्लासात ३९२ कॅलरी असतात. 
यामुळे हृदयविकाराचा धोका बळावतो. वजनही वाढते. 


मांस- १०० ग्रॅममध्ये १८७ कॅलरी 
हृदयविकाराची शक्यता असते. मधुमेहही होऊ शकतो. 


पांढरा ब्रेड- १०० ग्रॅममध्ये २६५ कॅलरी असतात. लठ्ठपणा वाढतो. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची शक्यता वाढते. 

 

डार्क चॉकलेट- १०० ग्रॅममध्ये ५९८ कॅलरी असतात. मधुमेह होऊ शकतो. वजन वाढू शकते. 


तूप- १०० ग्रॅम तुपात ८७६ कॅलरी असतात. लठ्ठपणा वाढतो तसेच उच्च रक्तदाबही होऊ शकतो. 


चीज- १०० ग्रॅम चीजमध्ये ४०३ कॅलरी असतात. उच्च रक्तदाब होऊ शकतो. पोटाची चरबी वाढते. 

बातम्या आणखी आहेत...