आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल करण्यास उच्च न्यायालयाने दिली स्थगिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अनुप निरंजन डोडिया, आशिष निरंजन डोडिया व निरंजन डोडिया व संजीवनी डोडिया यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी तक्रारकर्ता शैलेश व्यासच्या तक्रारीवरून अवैध सावकारी व फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते. मात्र आरोपींनी एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांच्या तपासाला तसेच दोषारोपपत्र दाखल करण्याला स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार असून त्याला सिटी कोतवाली पोलिस व तक्रारदाराला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. 


तक्रारकर्ता शैलेश व्यास यांनी २२ मे २०१८ रोजी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भांदवि कलम ४२०, ४६७,४६८, ५०६, १२० ब नुसार गुन्हे दाखल केले होते. आरोपींना पोलिसांनी अटक केले होते. त्यानंतर न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर आरोपींनी एफआयआर रद्द करण्यासाठी नागपूर खंडपीठात धाव घेतली. 


आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. अनिल मार्डीकर, एस.जी. जोशी यांनी न्यायालयाला सांगितले की, शैलेंद्र व्यासने डोडिया यांच्याकडून धनादेशच्या माध्यमातून व्यवहार केले होते. हे धनादेश अनादर झाल्यानंतर शैलेंद्र व्यासला वकिलांच्या माध्यमातून २९ सप्टेंबर २०१७ रोजी नोटीस दिली होती. त्या नोटीसीचे त्याने १७ सप्टेंबर रोजी उत्तर दिले होते. उत्तर मिळाल्यानंतर शैलेंद्र व्यासच्या विरुद्ध अकोल्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात कलम १३८ नुसार याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर ९ महिन्यांनी म्हणजेच २२ मे २०१८ रोजी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार डोडिया परिवारावर दबाव टाकणे व रक्कम परत न देण्यासाठी करण्यात आली. याचिकाकर्त्याची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती आर.के. देशपांडे, अरूण डी. उपाध्याय यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, सिटी कोतवाली पोलिस आरोपींच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाही तसेच पोलिसांनी फसवणूक प्रकरणी दोषारोपपत्रही दाखल करू नये. तसेच पोलिसांनी आणि तक्रारदार व्यास यांनी पुढील तारखेवर हजर राहावे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...