आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​गणेशाेत्सव, नवरात्रात डीजे, डॉल्बी नाहीच; ध्वनी प्रदूषणामुळे बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ध्वनी प्रदूषणामुळे डीजे व डॉल्बीच्या वापरावर राज्य सरकारची बंदी उठवण्यास मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी नकार दिला. गणपती विसर्जन व नवरात्रोत्सवात डीजे-डॉल्बीचा दणदणाट नसेल. प्रोफेशनल ऑडिओ अँड लायटिंग संघटनेच्या (पाला) याचिकेवर सरकारने मत मांडले की, 'पाला'ने ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अधीन राहून डीजेचा वापर करण्याची लेखी हमी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ही सिस्टिम ध्वनी प्रदूषणाचा स्रोत असून उत्सवादरम्यान त्यांच्या वापराला परवानगी देणे योग्य नाही. ध्वनी प्रदूषणाबाबत ७५% प्रकरणे डीजे-डॉल्बीशी संबंधित असल्याचे सरकारने म्हटले होते. 

बातम्या आणखी आहेत...